मोठी बातमी! लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना मिळणार लोकलचं तिकिट

मुंबई तक

कोरोना काळात लोकल ट्रेन सेवा बंद होती. निर्बंध उठवत हळूहळू जसे नियम शिथील झाले तशा प्रमाणात लोकलही सुरू झाली. लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस झालेल्यांना पासही सुरू करण्यात आला. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लसीकरण पूर्ण होऊन पंधरा दिवस झालेल्या लोकांना लोकल तिकिटही मिळू शकणार आहे. राज्य सरकारने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना काळात लोकल ट्रेन सेवा बंद होती. निर्बंध उठवत हळूहळू जसे नियम शिथील झाले तशा प्रमाणात लोकलही सुरू झाली. लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस झालेल्यांना पासही सुरू करण्यात आला. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लसीकरण पूर्ण होऊन पंधरा दिवस झालेल्या लोकांना लोकल तिकिटही मिळू शकणार आहे. राज्य सरकारने आधी लोकलचं तिकिट बंद केलं होतं. तसे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिकिट खिडकीवर वाद, गोंधळ आणि संताप पाहण्यास मिळाला होता. अशात आता लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन प्रवासासाठीचं तिकिट मिळू शकणार आहे.

रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा.

हे वाचलं का?

    follow whatsapp