आर्यन खानच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ, जाणून घ्या कोर्टात काय काय घडलं?

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रविवारी ही अटक झाल्यानंतर त्याला आज पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यनला आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सतीश मानेशिंदे हे त्याचे वकील होते. त्यांनी कोर्टात युक्तिवाद केला. मात्र आर्यन खानची कोठडी वाढली आहे. कार्डिलिया क्रूझवर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

आज या प्रकरणातल्या आठही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यातले तीन आरोपी जे आहेत आर्यन खान, अरबाझ आणि मुनमुन धमेचा यांना रविवारीच एक दिवसाची कोठडी मिळाली होती. त्यांच्या कोठडीत 11 तारखेपर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी NCB ने केली होती. किला कोर्टाने या सगळ्यांच्या कोठडीत तीन दिवासांनी वाढ केली आहे. NCB तर्फे कोर्टात असं सांगण्यात आलं की आर्यन आणि अरबाझ यांच्या मोबाईलमधून काही व्हॉट्स अॅप चॅट आम्हाला मिळाले आहेत.

हे वाचलं का?

एनसीबीने असंही म्हटलं की, ‘चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी आम्हाला कस्टडीची आवश्यकता आहे. लिंक आणि नेक्सस समोर आणण्यासाठी देखील कस्टडीची गरज आहे. कारण यांच्या फोनमधून ड्रग्स तस्करांसोबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चॅट्स आढळून आलं आहे. याप्रकरणी छापेमारी देखील सुरु आहे.’ आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या क्रूझवर जाण्याआधीच या सगळ्यांना अटक कऱण्यात आली होती. ती क्रूझ जाऊ देऊ नका असं सांगितलं होतं. तरीही ती क्रूझ समुद्रात गेली आणि नंतर मागे फिरली. याबद्दलचीही माहिती NCB ने कोर्टात दिली.

यावेळी एनसीबीकडून कोर्टात असाही युक्तीवाद करण्यात आला की, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं देखील समजतं आहे. चॅटमधून असंही समोर आलं आहे की, त्याने बँक ट्रांझेक्शनसाठी कॅशची देखील मागणी केली आहे. आज NCB ने त्या क्रूझवर छापा मारला. तेव्हा त्यांना या क्रूझवर MDMA किंवा ज्याला म्याव म्याव म्हटलं जातं ते ड्रग्ज सापडलं आहे. आर्यन आणि इतर लोक यांना समोरासमोर बसवून आम्हाला चौकशी करायची आहे असं NCB ने म्हटलं आहे. सहा ग्रॅम चरस हे अरबाझ मर्चंटकडे सापडलं तर मुनमुन धमेचाकडे काही MDMA च्या काही गोळ्या सापडल्या असंही कोर्टात सांगण्यात आलं.

ADVERTISEMENT

ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आर्यन खानला आणि ट्रोल झाल्या जया बच्चन..

ADVERTISEMENT

यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट तर नाही ना? याचा तपास करायचा आहे त्यामुळे कोठडी वाढवावी असंही स्पष्ट करण्यात आलं. यावेळी सतीश मानेशिंदे असंही म्हणाले की आर्यन खानला ड्रग्ज कुणालाही विकण्याची गरज नाही. त्याची इच्छा असेल तर तो सगळं क्रूझ विकत घेऊ शकतो.

वकील मानेशिंदे यांनी कोर्टात आर्यनची नेमकी बाजू कशी मांडली?

दरम्यान, पूर्वी केलेले चॅट्सच्या आधारावर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच दुसऱ्यांसाठी माझ्या क्लायंटला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याची गरज नाही. यामुळेच जामीन देण्यात यावा अशी आम्ही मागणी करतो.

यावेळी मानेशिंदे यांनी एनसीबीने केलेला ड्रग्स खरेदी-विक्रीचा दावाही खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ‘खान यांनी ठरवलं तर संपूर्ण क्रूझ ते खरेदी करु शकतात. त्यामुळे त्यांना क्रूझवर ड्रग्स विकण्याची काहीही गरज नाही.’ असं म्हणत त्यांनी एनसीबीच्या कोठडी वाढवून देण्याच्या मागणीला विरोध केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT