गडचिरोली : वाघाची शिकार करुन पुरलं जमिनीत – अहेरी वनपरिक्षेत्रातली घटना
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्रातील एका वाघाची शिकार करुन त्याला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गस्तीवर असलेल्या वनरक्षकांना ही बाब लक्षात आली. गस्त घालत असताना ओढयाच्या लगत दुर्गंधी येत असल्याने वनरक्षक या दिशेने तपासाकरता गेले असताना त्या भागात रेतीवर वाळलेल्या झाडाची फांदी ठेवली होती, ज्यावर मोठ्या प्रमाणात माश्या घोंगावत होत्या. […]
ADVERTISEMENT
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्रातील एका वाघाची शिकार करुन त्याला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गस्तीवर असलेल्या वनरक्षकांना ही बाब लक्षात आली. गस्त घालत असताना ओढयाच्या लगत दुर्गंधी येत असल्याने वनरक्षक या दिशेने तपासाकरता गेले असताना त्या भागात रेतीवर वाळलेल्या झाडाची फांदी ठेवली होती, ज्यावर मोठ्या प्रमाणात माश्या घोंगावत होत्या. ही फांदी बाजूला करुन माती उकरली असता वाघाचं शव दिसून आलं.
ADVERTISEMENT
यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करुन वाघाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. ज्यात मृत वाघ ही पूर्ण वाढ झालेली मादी असल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे शिकाऱ्यांनी या वाघिणीचं शिर धडापासून वेगळं केलं होतं, तसेच तिच्या पायाची सर्व नखंही काढून घेण्यात आली होती. वाघाचं हे शव पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विसेरा, हाड, त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत.
प्राथमिक तपासात या वाघिणीची शिकार विजेच्या तारेचा वापर करुन करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. शासकीय नियमानुसार या वाघिणीच्या मृतदेहावर दहन करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT