आर्यन खानसाठी शिवसेना नेत्याने ठोठावलं सर्वोच्च न्यायालयाचे दार; NCB चीही चौकशी करण्याची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. २ ऑक्टोबरला NCB ने मुंबईत केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसह ८ जणांना अटक केली होती. आर्यन खान आणि NCB च्या कारवाईवरुन राज्यात रणकंदन सुरु असताना शिवसेना नेत्याने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ADVERTISEMENT

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या न्यायालयीन आणि संविधानीक अधिकारांचं रक्षण व्हावं यासाठी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिवारी यांनी सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांनी या प्रकरणात लक्ष घालून स्वतः चौकशी करावी अशी याचिकेद्वारे मागणी केली आहे. तसेच तिवारी यांनी आपल्या याचिकेत NCB च्या मुंबई युनिटने केलेल्या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उभं करुन चौकशीची मागणी केली आहे.

तिवारी यांनी आपल्या याचिकेत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिवारी यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडेंनी केलेल्या कारवायांची चौकशी करण्यात यावी. जामीन मिळणं हा आर्यन खानचा अधिकार आहे. त्याच्या याच अधिकारावर NCB च्या माध्यमातून गदा आणली जात आहे. समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री असल्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये नावलौकिक मिळवायचा आहे याचसाठी हे सर्व सुरु असल्याचंही तिवारी म्हणाले.

हे वाचलं का?

समीर वानखेडे हे शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सतत कारवाया करत असून ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीच आक्षेप घेतला आहे. मंत्री नवान मलिक यांनी वानखेडे यांची कारवाईची पद्धत आणि पंचनाम्यामधील काही त्रुटी शोधून काढत या प्रकरणाचा संबंध थेट समीर वानखेडेंच्या बहिणीपर्यंत नेऊन ठेवला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणा आहे.

ADVERTISEMENT

१४ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या सेशन कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. परंतू दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल २० तारखेपर्यंत राखून ठेवला आहे. दुसरीकडे मुलाच्या अटकेमुळे शाहरुखच्या घरी मन्नतवर सध्या तणावाचं वातावरण असून आर्यनची आई गौरी सध्या खूपच भावूक झाली आहे. मुलाची सुटका होत नाही तोपर्यंत घरात गोडधोड बनणार नाही असा आदेश गौरीने घरातल्या नोकरांना दिला आहे.

ADVERTISEMENT

ड्रग्ज केस : आर्यनची सुटका होत नाही तोपर्यंत खीर बनणार नाही – गौरी खानची नवीन ‘मन्नत’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT