नवनीत-रवी राणा विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा, कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं निरिक्षण जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन आदेशामध्ये याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. राणांना जामीन कोणत्या कारणांमुळे मिळाला आणि जामीन देताना कोर्टाचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात सविस्तरपणे. ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम […]
ADVERTISEMENT

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं निरिक्षण जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन आदेशामध्ये याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. राणांना जामीन कोणत्या कारणांमुळे मिळाला आणि जामीन देताना कोर्टाचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात सविस्तरपणे.
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठरवून अमरावतीहून मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जवळजवळ 12 दिवस त्यांना तुरुंगात घालवावे लागले.
दरम्यान, याप्रकरणी राणा दाम्पत्याने जामिनासाठी याचिका दाखल केली होती. बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन देण्यात आला. गुरुवारी राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका झाली आणि शक्रवारी त्यांचा सविस्तर जामीन आदेश कोर्टाने दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या जामीन आदेशात उल्लेख केल्यानुसार FIR पाहिला असता राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं मत नोंदवलं आहे.
जामीन आदेशात कोर्टाने राणांना जामीन का देण्यात आला याची कारणं नोंदवली आहेत. कोर्टाने राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचा उल्लेखही जामीन आदेशात केला आहे.