एक चिठ्ठी अन् मिस्ट्री गर्ल, तुनिषा शर्माच्या आत्महत्येपूर्वी काय घडलं?
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी सेटवरील मेकअप रुममध्ये आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणात पोलिसांनी (police) सह कलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड (Ex boyfriend) शीजान मोहम्मद खान (Sheezan mohammad Khan) याला अटक (arrest) केलेली आहे. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांना सेटवर […]
ADVERTISEMENT
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी सेटवरील मेकअप रुममध्ये आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणात पोलिसांनी (police) सह कलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड (Ex boyfriend) शीजान मोहम्मद खान (Sheezan mohammad Khan) याला अटक (arrest) केलेली आहे. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांना सेटवर एक कागद मिळाला आहे. त्याचबरोबर 10 इंच लांब कापडाची पट्टी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेता शीजान मोहम्मद खान याला ताब्यात घेण्यासाठी वाळीव पोलिसांनी रिमांड दस्तावेएवज सादर केले. यात काही महत्त्वाच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातून शीजान खानच्या अडचणी वाढण्याची संकेत मिळत आहेत.
वाळीव पोलीस 26 डिसेंबर 2022 रोजी रात्री जवळपास 2 वाजता नायगाव येथील अली बाबा दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर आरोपी शीजान खानला घेऊन गेले होते. तिथे पोलिसांनी सेटची पाहणी केली. पोलिसांनी सेटवरून एक कागद जप्त केला.
हे वाचलं का?
tunisha sharma : तुनिषाच्या मृत्यू प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ची एन्ट्री
तुनिषा शर्मा आत्महत्या : सेटवर मिळालेल्या पेपरवर काय लिहिलेलं?
पोलिसांना एक कागद मिळाला. कागदाच्या वरच्या बाजूला शीजान लिहिलेलं आहे, तर सर्वात शेवटी तुनिषा लिहिलेलं आहे. तसेच त्याखाली इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. मी सह कलाकार म्हणून मिळाले, हे त्याचं (शीजान खान) भाग्य आहे. (“He Is blessed to have me as a co-actor Woohooo”)
ADVERTISEMENT
पोलिसांनी सेटवरून 10 इंच लांब कपड्याची पट्टी जप्त केलीये. ही पट्टी कापून तयार करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे आरोपी शीजान खानचं तुनिषा शर्माबरोबरच दुसऱ्या एका मुलीसोबतही प्रेमसंबंध होते. तुनिषा शर्माने आत्महत्या केली, त्या दिवशी शीजान त्या मुलीसोबत दोन तास कॉलवर बोलत होता.
ADVERTISEMENT
Tunisha Sharma : अभिनेत्री प्रेग्नंट होती? PM मध्ये कळलं मृत्यूचं कारण
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : ‘शीजान खान तपासात मदत करत नाहीये’
तुनिषा शर्माने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी शीजान खानसोबत बोलली होती. त्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय घडलं की, तुनिषाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शीजान खानची चौकशी केली जात आहे, मात्र तो नीटपणे उत्तर देत नाही. तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी दोन आयफोनसह जप्त केले तीन मोबाईल
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खोलवर तपास करणं आवश्यक आहे. पोलिसांनी शीजान खानचा फोन जप्त केला आहे. या फोनमध्ये पोलिसांना व्हॉट्सअॅप चॅट मिळाली आहे. शीजान आणि तुनिषा, तुनिषाची आई यांच्यासोबतचे मेसेज आहेत. त्याचबरोबर शीजानचे त्याच्या आईसोबतचेही चॅट्स आहेत.
हे सर्व चॅट्स काढून लॅपटॉपमध्ये घेण्यात आले आहेत. त्याच आधारावर पोलीस आता शीजान खानची चौकशी करत असून, पुरावे गोळा करण्याचं काम करणार आहे.
Tunisha Sharma : तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप, शीजान मोहम्मद खानला अटक
पोलिसांच्या माहितीनुसार शीजान खानची दिवसातून अनेक वेळा चौकशी केली गेलीये, मात्र तो प्रश्नांची उत्तर नीट देत नाहीये. शीजान खानच्या मोबाईलमधील एका मुलीसोबतची चॅट डिलीट केलेली आहे. ते चॅटिंग मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
तुनिषाच्या आत्महत्येपूर्वी शीजान बोलत होता दुसऱ्या मुलीशी
पोलिसांच्या तपासात असंही समोर आलंय की, तुनिषा शर्माने ज्या दिवशी आत्महत्या केली. त्याच दिवशी शीजान खान दुसऱ्या एका मुलीसोबत दोन तास मोबाईलवरून बोलत होता. त्यामुळे ती मुलगी कोण याचाही तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईनेही शीजान खानवर गंभीर आरोप केलेले आहेत. शीजान खानचे तुनिषा शर्मासह इतर महिलांसोबतही प्रेमसंबंध होते, असा आरोप तुनिषाच्या आईने केलेला असून, पोलीस त्या अंगानेही तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT