राहुल गांधी वीर सावरकरांबाबत योग्यच बोलले, तुषार गांधींचा पाठिंबा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. पुण्यात काँग्रेसने वीर सावरकर माफीवीर असल्याचे पोस्टर लावले त्यानंतर ते वीर सावरकर प्रेमींकडून फाडले गेले. तसंच भाजपकडून राहुल गांधींवर टीकेची झोड उठली आहे. अशात आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी योग्यच बोलले असं म्हटलं आहे. काय म्हणाले […]
ADVERTISEMENT

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. पुण्यात काँग्रेसने वीर सावरकर माफीवीर असल्याचे पोस्टर लावले त्यानंतर ते वीर सावरकर प्रेमींकडून फाडले गेले. तसंच भाजपकडून राहुल गांधींवर टीकेची झोड उठली आहे. अशात आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी योग्यच बोलले असं म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत तुषार गांधी?
राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. कारण विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेन्शनही घेतलं होतं. पुढच्या काळात त्यांनी ब्रिटिशांसाठी कामही केलं होतं. त्यामुळे सत्य सांगायला जर आपण घाबरलो तर आपण त्या सत्याशी दगाबाजी करतो आहोत. असं म्हणत तुषार गांधी यांनी राहुल गांधीचं वक्तव्य योग्यच आहे असं म्हटलं आहे. तुषार गांधी हे आज राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
आणखी काय म्हणाले तुषार गांधी?
मी कित्येक दिवसांपासून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा विचार करत होतो. जे पुरोगामी विचारांचे लोक आहेत त्यांनी या यात्रेत सहभागी होणं गरजेचं आहे. शेगावमध्ये ही यात्रा येत आहे, असं कळताच मी या यात्रेत येण्याचा निर्णय घेतला. कारण हे माझं जन्मस्थळ आहे, असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
राहुल गांधी यांनी हिंगोलीतल्या सभेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला. एवढंच नाही तर वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला. तसंच गुरूवारी त्यांनी एकत्र पत्रही दाखवलं त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी नेमका काय उल्लेख केला होता ते वाचून दाखवलं. त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे.