मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत दाखल; उच्च न्यायालयाच्या इमारतीचं करणार उद्घाटन

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असून, त्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत दाखलही झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्त होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गेल्या महिनाभराच्या कालावधी दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असून, त्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत दाखलही झाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्त होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गेल्या महिनाभराच्या कालावधी दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने औरंगाबादमध्ये मुख्यंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. त्यामुळे गेल्या महिन्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री औरंबादमध्ये होते. यावेळी त्यांनी अनेक घोषणा मराठवाड्याच्या विकासासंदर्भात केल्या होत्या.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा?

हे वाचलं का?

    follow whatsapp