उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादात; शिंदे – ठाकरे गटाचे आरोप-प्रत्यारोप
औरंगाबाद : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवारी) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या औरंगाबादमध्ये गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली. जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं […]
ADVERTISEMENT
औरंगाबाद : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवारी) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या औरंगाबादमध्ये गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे.
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेशिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या संभाजीनगर गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. pic.twitter.com/AxbVmFmY8e
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 23, 2022
मात्र ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन आरोप-प्रत्यारोप आणि टीका-प्रत्यूत्तराचे राजकारण सुरु झाले आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यावर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने जोरदार टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते आणि मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दूल सत्तार, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केवळ २ तासांच्या दौऱ्यात ठाकरेंना शेतकऱ्यांच्या काय व्यथा समजणार असा प्रश्न केला आहे.
मुख्यमंत्री असताना तासनतास बसले बांद्र्यावर, पद गेल्यावर 15 मिनिट शेतकऱ्यांच्या बांधावर, अशी उपहासात्मक टीका प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. तर अडीच वर्षात उद्धव ठाकरे पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत, चांगलं आहे. पण काही मिनिटांच्या दौऱ्यात त्यांना काय कळेल, परतीचा पाऊस जसा जाणार तसा हा मान्सून मातोश्रीवर परतणार, पण तरीही त्यांनी काही सुचना केल्या तर नक्कीच विचार करू, असं अब्दूल सत्तार म्हणाले.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री असताना तासनतास बसले बांद्र्यावर
पद गेल्यावर आता 15 मिनिट शेतकऱ्यांच्या बांधावर … https://t.co/yj7gDhtbyT
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 23, 2022
दरम्यान, उदय सामंत यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करताना एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल, असे सांगत शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांचा आढावा सांगितला आहे.
प्रति,
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचा रहिवासी,
ADVERTISEMENT
सस्नेह जय महाराष्ट्र
पत्रास कारण की,
उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या बांधावर 2 तासांसाठी जाणार आहेत असे समजते. सत्ता गेल्यानंतरचा शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा पहिलाच दौरा.
ते मातोश्रीबाहेर पडुन आपल्या लक्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायवेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगर (औरंगाबाद) पोहचतील. तिथून पुढे लक्झरी कारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत फोटोसेशन करतील. हा Event करताना उद्धवजी यांची लार्जर न लाईफ प्रतिमा दिलली पाहिजे याची त्यांचे फोटोग्राफर व्यवस्थित काळजी घेतील. या संपूर्ण दौऱ्यात उद्धवजींसमवेत मातोश्रीवरील उद्धवजींच्या कानात खुसफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले, शेतकऱ्यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व “बडवे सोबत असतील, है “बडवे शेतकऱ्यांना उद्धवजींच्या जवळ येणं तर सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वतःच महत्व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या हे बडवेच उद्धवजींना सांगतील.
बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे…. pic.twitter.com/CCxWwkJH1j
— Uday Samant (@samant_uday) October 23, 2022
केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेल्या या लक्झरीयस दौऱ्यात/Event मध्ये उद्धवजी स्वःताचा छंद जोपासून शेतकऱ्यांचे फोटो काढतील, त्यानंतर मुंबईत या फोटोचे प्रदर्शन भरवून सेलिब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील.. प्रदर्शन पाहतील.. उद्धवजींची फोटोग्राफी किती चांगली आहे. याचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील बडवे शिवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटोंवर बोली लाऊन खरेदी करण्याचे आदेश देतील. परंतु आदेश पाळणारे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हृदयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाहीत याची सर्वांना जाणीव आहे.
तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौऱ्याचे हे प्रवासवर्णन करत आहे.
आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारी शिवसेना व शिवसैनिक ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे यांचे सोबत आहेत. त्यामुळे बळीराजाची काळजी घ्यायला वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना समर्थ आहे !! म्हणूनच सांगायला अभिमान वाटतो की
१) ३ वर्षांपूर्वी आपण जाहीर केलेले नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे ५० हजार रुपये आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.
२) भूविकास बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली.
३) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (४) नुकसान भरपाईसाठी 2 एकर जमिनीची मर्यादा 3 एकर केली आहे.
बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे, याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला आहे. बळीराजाची काळजी आम्ही आताही घेतच आहोत आणि भविष्यात देखील घेत राहू.
उद्धव ठाकरेंचे प्रत्तूत्तर
या सर्व टीकांवर उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद दौऱ्यात प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, ज्यांना घरात सगळ देऊन ते घर सोडून फिरतात त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT