Uddhav Thackeray यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही: महाजन
Uddhav Thackerays wont even have time to regret it said girish mahajan: जळगाव: ‘भाजपशी (Bjp) युती तोडणं ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आयुष्यातील खूप मोठी चूक आहे. आता त्यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही.’ अशी टीका करत भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि […]
ADVERTISEMENT
Uddhav Thackerays wont even have time to regret it said girish mahajan: जळगाव: ‘भाजपशी (Bjp) युती तोडणं ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आयुष्यातील खूप मोठी चूक आहे. आता त्यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही.’ अशी टीका करत भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर भाजप नेते हे अतिशय आक्रमकपणे ठाकरे गटावर टीका करताना दिसून येत आहेत. त्यातही आता थेट उद्धव ठाकरेंवरच टीका केली जात आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. (breaking alliance with bjp will be a big mistake of uddhav thackerays life he wont even have time to regret it said girish mahajan)
ADVERTISEMENT
पाहा गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर नेमकी काय टीका केली?
‘हळूहळू आपल्याला सगळं बघायला मिळेल, अजून तर काहीच झालं नाही. असं मला वाटतं. उद्धव ठाकरे यांना तर पश्चातापही करायला वेळ मिळणार नाही. आमच्या सोबत युती करून ते निवडून आले आणि त्यानंतर युती तोडली. ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. त्यांच्याकडे काहीच राहणार नाही, आता नावही गेलं, पक्ष, चिन्ह गेलं आहे. येणाऱ्या काळ त्यांच्यासाठी अजून वाईट राहील.’ असेही गिरीश महाजन म्हणाले.
‘उद्धव ठाकरेंचा आता तोल जायला लागला आहे. एकीकडे शिवसेनेचे मालक ते म्हणत होते. त्यांच्या घरात मातोश्रीमध्ये सगळी शिवसेना होती. आता ती खऱ्या अर्थाने बाहेर आलेली, जनताभिमुख झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कोणालाही काहीही बोलतील वाटेल ते बोलतील.. न्यायालयामध्ये निर्णय झाल्यानंतर ते काय बोलतील याचा नेम नाही.’
हे वाचलं का?
‘Amit Shah तर मोगॅम्बो..’, तळवे चाटल्याच्या टीकेवर ठाकरेंचा पलटवार
‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांचे विचार असे होते का.. की काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसा, राष्ट्रवादीच्या विचाराने तुम्ही तुमचा पक्ष चालवा? बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिव्या घातल्या.’
ADVERTISEMENT
‘बाळासाहेबांच्या मनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी राग होता. पण त्यांचे चिरंजीव आणि कुटुंबीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. बाळासाहेब तुमचे वडील आहेत म्हणून ते तुमचे नाहीत बाळासाहेब हा एक विचार आहे.’ अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
ADVERTISEMENT
Shiv Sena: चिन्ह, पक्षानंतर ठाकरेंना आणखी धक्का, ‘या’ दोन गोष्टीही निसटल्या!
अमित शाहांनी देखील साधला निशाणा
‘कालच एक मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जी लोकं खोटेपणाच्या आधारावर हुंकार भरत होते त्यांना आज माहित पडलं की, सत्य कोणासोबत आहे.’
‘2019 च्या निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक आम्ही युतीत लढलो. स्वत:च्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली आणि नंतर मुख्यमंत्री बनणण्यासाठी विरोधी विचारधारा असलेल्यांचे तळवे चाटू लागले. आज त्यांनाच सत्य काय आहे ते कळलं आहे.’ अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT