Shivsena : ठाकरेंकडून दोन निष्ठावंत मावळ्यांना प्रमोशन : पराग डाकेंवरही नवी जबाबदारी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत काही बदल केले आहेत. यामध्ये खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे जेष्ठ नेते लीलाधर डाके यांचे पुत्र पराग डाके यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही निष्ठावंत राहिलेल्या मावळ्यांना प्रमोशन […]
ADVERTISEMENT

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत काही बदल केले आहेत. यामध्ये खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे जेष्ठ नेते लीलाधर डाके यांचे पुत्र पराग डाके यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही निष्ठावंत राहिलेल्या मावळ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे तर डाकेंसारख्या जेष्ठांचीही काळजी घेण्यात आली आहे.
शिवसेना नेतेपदी अरविंद सावंत, भास्कर जाधव !
सचिवपदी पराग लीलाधर डाके. pic.twitter.com/jEYFYd56I6
— Shivsena Communication (@ShivsenaComms) August 28, 2022
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फुट पडली आहे. शिंदे यांच्यासमवेत तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर 12 खासदारांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहिर केला. या फुटीमध्ये काही पक्ष संघटनेतील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींनीही ठाकरेंची साथ सोडली. यात नेतेपदावर असलेल्या माजी आमदार रामदास कदम, माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचाही समावेश होता.
खैरेंचा पहिल्यांदा सत्कार झाला अन् शिरसाटांचा इगो दुखावला : जलील, सावेंची मध्यस्थी
या सर्व घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षावरच दावा सांगितला आहे. यावर सध्या न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिंदे यांना प्राथमिक टप्प्यात पक्षात उभी फूट पडल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.