टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे असं का म्हणाले उद्धव ठाकरे? दसरा मेळाव्याबाबतही केलं मोठं वक्तव्य
मुंबई: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन आणि भाजपच्या मदतीने ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीचं आवाहन करत आहेत. शिवसेनेकडून वाहतूक सेनेच्या नवीन सदस्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून 11 हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रं […]
ADVERTISEMENT
मुंबई: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन आणि भाजपच्या मदतीने ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
ADVERTISEMENT
पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीचं आवाहन करत आहेत. शिवसेनेकडून वाहतूक सेनेच्या नवीन सदस्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून 11 हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रं जमा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले?
नवीन सदस्यांचे सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी ते म्हणाले ”मला हे सर्व शपथपत्र घेऊन जाण्यासाठी पुन्हा याच वाहतूक सेनेची गरज पडली पाहिजे एवढी शपथपत्र जमा करा”.
हे वाचलं का?
बाकी जे काही बोलायचं आहे, ते दसरा मेळाव्यात बोलणारच- उद्धव ठाकरे
“सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जे खड्डे पडलेत त्याच काय करायचं ते बघू- उद्धव ठाकरे
“लढण्याचा एक काळ असतो, वाहतूक सेना म्हटल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची सवय असते. रस्त्यात खड्डे असतात तरीही आपल्याला तो रस्ता पार करायचा असतो. हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडलेत, त्याचं काय करायचं? हे आपण उद्या बघू…” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील नेत्यांना टोला लगावताना आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान बंड केल्यापासून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 40 आमदार आणि 12 खासदार शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा करत आहेत. त्याचबरोबर गेली अनेक वर्ष होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन्ही गटाकडून मेळावा घेण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा वाद अजूनही सुप्रिम कोर्टात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT