‘ऋषी सुनकांच्या पंतप्रधानपदाचं श्रेय शिंदे-फडणवीसांना’; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना चिमटा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जगातील ३३ देशांनी आपल्या बंडाची नोंद घेतल्याचा पुनरुच्चार सातत्यानं करताहेत. शिंदेंच्या याच विधानावरून आता सामनातून चिमटे काढण्यात आलेत. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदेंबरोबर फडणवीसांवरही निशाणा साधण्यात आलाय.

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखात म्हटलंय की, ‘महाराष्ट्रातील राजकीय ‘सामना’ मिंधे गटाने म्हणे तीन महिन्यांपूर्वी जिंकला. पुन्हा सामना अद्यापि सुरूच असल्याने या दिवाळीत वेगवेगळ्या तलावांवर भल्या पहाटेच ‘सोन्याचा धूर’ निघाला. द्वारका जशी श्रीकृष्णामुळे एका क्षणात सोन्याची झाली, तशी महाराष्ट्रातही लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली. मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले.”

सामनात ‘चाळीस खोकेबाज आमदार’ उल्लेख

“मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकला आहे. त्यामुळे शिधा कशाला घ्यायचा, आपण सराफ बाजार आणि शेअर बाजारात जाऊ. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले. मिंधे गटाच्या चाळीस खोकेबाज आमदारांमुळे सोन्याचा बाजार आणि शेअर बाजारही वधारला. हे सर्व शक्य झाले ते तीन महिन्यांपूर्वी मिंधे गटाने सामना जिंकल्यामुळेच”, असंही सामना अग्रलेखात म्हटलंय.

हे वाचलं का?

“भारताच्या विजयाचं श्रेय मिंधे-फडणवीसांना”, सामनात काय म्हटलंय?

“ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला, पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते, तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल”, असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला ठाकरेंनी लगावला.

“जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे”, असा चिमटा सामनातून काढण्यात आलाय.

ADVERTISEMENT

“सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे, असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले. ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप झाले. हे टपाल लंडनला पोहोचवून ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली गेली”, असा टोलाही शिंदेंना ठाकरेंनी लगावलाय.

ADVERTISEMENT

“आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल. सुनक यांना पाठिंब्यासाठी लागणारे खासदार सुरत, गुवाहाटी, गोव्यात आणून ठेवले होते काय? याचा खुलासा झालेला नाही. शिवाय जे खासदार सुनक यांना पाठिंबा देणार नाहीत त्यांना येथील ‘ईडी’ने ‘टाइट’ केले काय? ते मिंधे महाशयच सांगू शकतील, पण सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच”, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT