Shivsena : उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख; शिंदेंचे मुख्य नेते पद अस्तित्वातच नाही – ठाकरे गटाचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? हा वाद निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. तो सोडविण्यासाठी आयोगाने दोन्ही बाजूंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षाध्यक्ष आणि चिन्ह म्हणजेच धनुष्य-बाण यावरही दावा सांगितला आहे. त्यांनी याबाबत आयोगाला पत्र लिहिले होते. याबाबतही आयोगाने ठाकरे गटाला शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, आज ठाकरे गटाने याबाबतचे उत्तर आणि कागदपत्र सादर केली. ठाकरे गटाचे वकील सनी जैन म्हणाले, काल आम्ही आमचे प्राथमिक उत्तर दाखल केले आणि आजही आम्ही उत्तर दाखल केले. आम्ही आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणींची शपथपत्रं सादर केली आहेत. तसेच 2.5 लाखांहून अधिक शपथपत्रं लवकरच सादर केली जातील. 10-15 लाख प्राथमिक सदस्यांचीही शपथपत्र दाखल केली जाणार आहेत. ही शपथपत्रं आणि इतर गोष्टी विहित नमुन्यात सादर करण्यासाठी 4 आठवड्यांचा अवधी मागितला आहे.

तातडीच्या सुनावणीला विरोध :

एकनाथ शिंदे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. त्याला आज उत्तर दाखल करताना ठाकरे गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. शिंदे गट पोटनिवडणूकीत उमेदवार उतरवणार नाही. मग चिन्हाची मागणी कशासाठी करत आहे? रिक्त जागेवर आधी आमचाच उमेदवार, निवडणूक आयोगाची टीम आमची तयारी पाहू शकते, असे निमंत्रण आयोगाला देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

तसेच अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्य-बाण चिन्ह गोठवलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर देताना ठाकरे गटाने म्हटले की, जर शिंदे गटाचा उमेदवारच नसले तर चिन्हाबाबत निर्णय घ्यायला आणीबाणीची स्थिती नाही. त्यामुळे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी. केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून एकनाथ शिंदे यांनी आयोगाला पत्र पाठवले, असा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.

मुख्य नेता पद अस्तित्वातच नाही :

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही कुणाचे आव्हान नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची नेमणूक केलेले ‘मुख्य नेते’ हे पद शिवसेनेत अस्तित्वातच नाही, असे काही दावे ठाकरे गटाने आजच्या उत्तरात केले आहेत. मुख्य नेता पदावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला नेमलं, मात्र असं पदच शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही. त्यामुळे चिन्हावर दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आहे, असेही म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT