‘पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले’ : नवीन नाव अन् चिन्हांनंतर ठाकरे गटाचे नेते खुश
मुंबई : पहिली खरी लढाई पहिल्याच प्रयत्नात जिंकली, अशी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाला मिळालेल्या नवीन नावाचं आणि चिन्हांचं स्वागत केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले. या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आम्हाला शिवसेना […]
ADVERTISEMENT
मुंबई : पहिली खरी लढाई पहिल्याच प्रयत्नात जिंकली, अशी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाला मिळालेल्या नवीन नावाचं आणि चिन्हांचं स्वागत केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले. या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
त्या म्हणाल्या, आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळालं आहे. पहिली खरी लढाई पहिल्याच प्रयत्नात जिंकली आहे. एक गाणं आहे, उषःकाल होता होता, काळरात्र झाली. मात्र शिवसैनिकांसाठी आता यातील काही ओळी बदलत आहे. उषःकाल होता होता, काळरात्र झाली, अरे शिवसैनिकांनो पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं गाणं त्यांनी म्हटलं. पेडणेकर म्हणाल्या, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
तर पहिल्याच प्रयत्नात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्णपणे जिंकले आहेत. याचं कारण म्हणजे आम्हाला जे नाव मिळालं ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव राहिलं. आम्ही जी तीन चिन्ह दिली होती, त्यातली मशाल हे चिन्ह आम्हाला मिळालं. त्यामुळे पहिल्या डावात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. म्हणून आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ABP माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
हे वाचलं का?
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालं नसलं तरी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT