उद्धव ठाकरेंच्या खासदाराकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; ‘राष्ट्रवादी’सोबत युती न करण्याची मागणी
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी बंडखोर, भाजपसह सर्वांवरती टीका केली आहे. एकनाथ शिंदे गटाला त्यांनी मिंधे गट म्हणत हिणवलं आहे, तर अमित शाहांना थेट निवडणुका घेण्याचं आव्हान केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खासदार गजानन किर्तीकर यांनी मुंबई तकशी संवाद साधला, यामध्ये त्यांनी आगामी काळात […]
ADVERTISEMENT
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी बंडखोर, भाजपसह सर्वांवरती टीका केली आहे. एकनाथ शिंदे गटाला त्यांनी मिंधे गट म्हणत हिणवलं आहे, तर अमित शाहांना थेट निवडणुका घेण्याचं आव्हान केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खासदार गजानन किर्तीकर यांनी मुंबई तकशी संवाद साधला, यामध्ये त्यांनी आगामी काळात राष्ट्रवादीशी युती नको, हवं तर एकटं लढू असं म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
गजानन किर्तीकर मुंबई तकशी बोलतना काय म्हणाले?
गजानन किर्तीकर म्हणाले ”आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी आम्ही मुंबईच्या गटप्रमुखांना बोलावत असतो, आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो. आगामी काळात शिवसेनेची कोणाशी युती असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु राष्ट्रवादीसोबत युती नको अशी भूमिका अनेक शिवसैनिकांची आणि आमदार-खासदारांची आहे. १५ आमदार शिंदे गटात गेले नसले तरी, मी शिंदे गटात गेलो नसलो तरी माझं मत आहे राष्ट्रवादीसोबत युती नको. हवं तर एकटं लढू पण राष्ट्रवादीसोबत युती नको, तशी भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडल्याचे” शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी मांडली आहे.
शंभुराज देसाईंनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना, ठाकरेंना काढले चिमटे
हे वाचलं का?
गजानन किर्तीकरांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल गजानन किर्तीकर म्हणाले ” एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला किंवा स्वतंत्र शिवसेना स्थापन केली.बाळासाहेबांचे विचार घेऊन ते पुढे जात आहेत असे म्हणाले प्रत्यक्ष कृतीमध्ये ते तसं करत आहेत. मराठी माणसांचं हित मी सांभाळेल असं सांगत आहेत, भाजप सोबतची नैसर्गिक युती आम्ही केलेली आहे वेगळ काही केलेलं नाही असं ते सांगत आहेत.”
शिंदे गटात जाण्यावर गजानन किर्तीकर काय म्हणाले?
मागच्या काळात ज्यावेळी गजानन किर्तीकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. तेव्हापासून गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती. गणपतीच्या काळातही गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. परंतु आता स्वत: किर्तीकरांनीच याला ब्रेक लावला आहे. काही झालं तरी मी शिंदे गटात जाणार नाही असं त्यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT