पोलिसाने नोकरीचं आमिष दाखवून केला बलात्कार, यवतमाळमधील ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येचं गुढ उकललं
यवतमाळच्या उमरेड शहरातील वसंत नगर भागात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भाड्याच्या खोलीवर एका तरुणीचा गळफास घेतलेला मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालंय. उमरेड पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपी कर्मचारी विजय हटकर याच्यावर बलात्कार आणि आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा […]
ADVERTISEMENT
यवतमाळच्या उमरेड शहरातील वसंत नगर भागात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भाड्याच्या खोलीवर एका तरुणीचा गळफास घेतलेला मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालंय.
ADVERTISEMENT
उमरेड पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपी कर्मचारी विजय हटकर याच्यावर बलात्कार आणि आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने विजय हटकरला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीला आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने तुला पोलीस दलात नोकरी लावून देतो असं आमिष देत खासगी पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रवेश मिळवून दिला. यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवत आरोपी विजय हटकरने तिला आपल्या भाड्याच्या घरी बोलवून शारिरिक अत्याचार करायला सुरुवात केली. आरोपी विजय हा दंगल नियंत्रण पथकात उमरेड येथे कार्यरत होता.
हे वाचलं का?
क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार
अनेक वेळा सामान्य नागरिक एखाद्या संकटात मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतात. परंतू या प्रकरणात पोलिस विभागातील एका कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस असल्याने पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे.
ADVERTISEMENT
धक्कादायक ! वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलेवर मावस जावयाकडून अत्याचार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT