प्रतापगडावरच्या अफझल खानाच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं, कलम १४४ लागू
प्रतापगड परिसरात असलेल्या अफझल खानाच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. चार जिल्ह्यातले १५०० हून अधिक पोलीस साताऱ्यात दाखल झाले आहेत. बुधवारी रात्रीपासूनच अतिक्रमण हटवण्याची तयारी अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच अतिक्रमण पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक […]
ADVERTISEMENT

प्रतापगड परिसरात असलेल्या अफझल खानाच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. चार जिल्ह्यातले १५०० हून अधिक पोलीस साताऱ्यात दाखल झाले आहेत.
बुधवारी रात्रीपासूनच अतिक्रमण हटवण्याची तयारी
अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच अतिक्रमण पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुका मध्ये दाखल झाले होते मात्र पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.
144 कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.