क्रोनोलॉजी समझिये… पाहा आर्यन खानसाठी पुढे सरसावलेले नवाब मलिक कसे सापडले ईडीच्या जाळ्यात!
मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्या बचावासाठी राजकीयदृष्ट्या पुढे कोण सरसावलं होतं तर ते होते मंत्री नवाब मलिक. मात्र याचा नवाब मलिकांना आज ईडीने अटक केली आहे. त्यामुळे त्यांच्या अटक होण्यापर्यंतचा नेमका प्रवास कसा आहे जाणून घेऊयात अगदी सविस्तर.. आर्यन खानची अटक ते नवाब […]
ADVERTISEMENT

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्या बचावासाठी राजकीयदृष्ट्या पुढे कोण सरसावलं होतं तर ते होते मंत्री नवाब मलिक. मात्र याचा नवाब मलिकांना आज ईडीने अटक केली आहे. त्यामुळे त्यांच्या अटक होण्यापर्यंतचा नेमका प्रवास कसा आहे जाणून घेऊयात अगदी सविस्तर..
आर्यन खानची अटक ते नवाब मलिकांची अटक नेमकं काय-काय घडलं?
-
2 ऑक्टोबर 2021- NCB ने कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला. या ठिकाणी होणारी रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज पार्टी त्यांनी उधळून लावली. त्यावेळी एनसीबीने आर्यन खान, त्याचा खास मित्र अरबाझ मर्चंट याच्यासहीत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं.
3 ऑक्टोबर 2021- समीर वानखेडे हे एनसीबीनेच विभागीय संचालक आहेत त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर काही वेळातच्या ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि सेवन केल्याप्रकरणी आर्यन खानसहीत आठही जणांना अटक करण्यात आली.