Underworld Don अरूण गवळी होणार ग्रॅज्युएट, BA च्या अंतिम वर्षाची परीक्षा पास करण्यासाठी दोन पेपर बाकी..
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी आता लवकरच ‘ग्रॅज्युएट’ होणार आहे. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना अरुण गवळी याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीए चा अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असून डॉन सध्या बीए च्या अंतिम वर्षांत असून, अरुण गवळीने दोन पेपर दिल्यास तो बीए ग्रॅज्युएट होणार आहे. बीए अंतिम वर्षाचे पाच पैकी […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी आता लवकरच ‘ग्रॅज्युएट’ होणार आहे. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना अरुण गवळी याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीए चा अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असून डॉन सध्या बीए च्या अंतिम वर्षांत असून, अरुण गवळीने दोन पेपर दिल्यास तो बीए ग्रॅज्युएट होणार आहे. बीए अंतिम वर्षाचे पाच पैकी 3 पेपर त्याने पास केले असून 16 जुलै रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

गवळी जेल मध्ये मन लावून आपला अभ्यास करत आहेत. अभ्यासात त्याला काही अडचणी आल्यास त्या तो एखाद्या विद्यार्थी प्रमाणे विचारतो अशी माहिती इग्नूचे डायरेक्टर पी शिवस्वरुप यांनी दिलीय.अरुण गवळी मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.शिक्षणासाठी त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात बीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलाय. सध्या अरुण गवळी बीएच्या अंतिम वर्षात आहे आणि त्याने दोन पेपर पास केल्यानंतर तो बीए ग्रॅज्युएट होणार आहे.यापूर्वी ऑगस्ट 2018 मध्ये अरुण गवळी याने नागपूर जेल मध्ये असतांना गांधी विचार मंच च्या परीक्षेत टॉप केलं होतं.. 80 पैकी 74 गुण त्याने प्राप्त केले होते.









