आठ 8 आसनापर्यंतच्या प्रत्येक कारमध्ये सहा एअरबॅग असणं सक्तीचं, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

मुंबई तक

चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनापर्यंतच्या चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी दिली आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काय आहे गडकरींचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनापर्यंतच्या चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी दिली आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे गडकरींचं ट्विट?

आठ आसनापर्यंतच्या चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

चारचाकी कारमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांचा अपघात झाल्यास धडक बसण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनापर्यंतच्या वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील कार आधीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होऊ शकते असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp