सोयाबीनचा भाव विचारायला आला आणि साडेचार लाख रोकड घेऊन पसार झाला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे बाजारपेठ भागातून एका व्यापाऱ्याच्या दुकानातून चोरट्याने साडेचार लाखाची रक्कम पळवली आहे. रोकड लंपास करायला आलेले दोन अनोळखी चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सोयाबीनचा भाव विचाराया आलेल्या या चोरट्यांनी मालकाला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि इतक्यात एकाने संधी साधून पैश्यांची पिशवी पळवली.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, इद्रीस इक्बाल या व्यापाऱ्याचं अनम ट्रेडर्स या नावाने अडत धान्य खरेदी दुकान आहे. धारणी येथे आज आठवडी बाजार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाची किंमत द्यायला इक्बाल यांनी बँकेतून ३ लाख तर घरातून दोन लाख रुपये आणले. यातील ५० हजाराची रक्कम इक्बाल यांनी आपल्या गल्ल्यात ठेवली तर साडेचार लाख एका पिशवीत घालून खाली ठेवले.

यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन चोरटे दुकानात आले आणि त्यांनी इक्बाल यांना धान्याचे भाव विचारुन गुंतवून ठेवलं. संधी साधत एका चोरट्याने रक्कम पळवत साथीदाराला इशारा करुन धूम ठोकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या आधारावर चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT