भाजप-शिंदे गटात अलिखीत करार? एकमेकांचे मतदारसंघ अन् कार्यकर्त्यांबाबत मोठा निर्णय
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरुन खाली खेचत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. परंतु स्थानिक पातळीवरती शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये घेण्याचा धडाका सुरुच होता. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजपनं अनेक माजी नगरसेवक, माजी आमदार, पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला आहे. आता या पार्श्वभूमिवर […]
ADVERTISEMENT
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरुन खाली खेचत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. परंतु स्थानिक पातळीवरती शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये घेण्याचा धडाका सुरुच होता. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजपनं अनेक माजी नगरसेवक, माजी आमदार, पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला आहे. आता या पार्श्वभूमिवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काय आदेश दिला?
राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना शिंदे गटाचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी फोडू नयेत अशा सूचना दिल्या आहेत. तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी करु नका असे निर्देशही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. आता हा निर्णय घेण्याचे कारण काय?…तर आगामी काळात महापालिका निवडणुका होणार आहेत, त्याअगोदर या फोडाफोडीच्या राजकारणावरुन दोघांमध्ये संबंध बिघडू नये म्हणून भाजपकडून काळजी घेण्यात आली आहे.
आजी-माजी मुख्यमंत्री भाषणात व्यस्त, भाजपनं साधला डाव
21 सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या गटनेत्यांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, शिंदे गटातील आमदार, खासदार, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अमित शाहांनाही टार्गेट केलं. या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनीही दिल्लीतून संवाद साधला आणि ठाकरेंच्या भाषणाला उत्तर दिलं. आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु असतानाच भाजपने डाव साधला. बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच नाही तर शिंदे गटालाही हा मोठा धक्का समजला जात आहे.
हे वाचलं का?
दरम्यान आगामी काळात होणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदे गट सोबत लढणार आहे. त्यामुळे दोघांनाही कार्यकर्ते सांभाळणे फार गरजेचं आहे. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिंदे गट, शिवसेना या पक्षातून कार्यकर्ते, नेते घेण्याचा धडाका लावला होता. शिंदे गटानंही अनेक ठिकाणी भाजपला सुरुंग लावला, त्यामुळे आगामी काळात स्थानिक पातळीवर काही घडू नये म्हणून भाजप आणि शिंदे गटामध्ये अलिखीत करार झाल्याचं बोललं जातं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT