ट्रेकिंग ठरलं जीवघेणं! 11 पैकी सात ट्रेकर्सचे मृतदेह सापडले, दोघांना वाचवण्यात यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तराखंडवरून हिमाचल प्रदेशच्या दिशेनं निघालेल्या 11 गिर्यारोहकांपैकी (ट्रेकर्स) 7 जणांना जीव गमावावा लागला आहे. 17 ते 19 ऑक्टोबरच्या दरम्यान हे ट्रेकर्स अचानक बेपत्ता झाले होते. मागील चार दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात आहे. यात सात जणांचे मृतदेह सापडले असून, दोघांना वाचवण्यात यश आलं आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीवरून हिमाचल प्रदेशातील छितकुल या दरम्यान 11 गिर्यारोहक 11 ऑक्टोबर रोजी निघाले होते. मात्र हवामान खराब झाल्याने ते अडकले होते. नियोजित वेळेवर ठरलेल्या ठिकाणी गिर्यारोहक न पोहचल्यानं संबंधित ट्रेकर्स संस्थेने यासंबंधीची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. या मोहिेमेत आतापर्यंत दोघांना वाचवण्यात यश आलं आहे, तर सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. समोर आलेल्या माहितीप्रमाणे 11 ट्रेकर्सचा गट 17 ते 19 ऑक्टोबरच्या दरम्यान लमखागाच्या जवळ बेपत्ता झाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या ट्रेकर्सच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने हवाई दलाच्या हेलिकॉप्टरबरोबरच आयटीबीपी आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली. सध्या ही शोध मोहीम सुरूच असून उर्वरित ट्रेकर्सचा शोध घेतला जात आहे. सातही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले आहेत. ज्या दोन जणांना वाचवण्यात आलं आहे, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

उत्तराखंड सरकारने समुद्र सपाटीपासून २० हजार फूट उंचीवर असलेल्या लमखागा दरीत ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती हिमाचल प्रदेश सरकारला दिली होती. लमखागाजवळ सर्वात अवघड दऱ्यांपैकी एक दरी असून, ही किन्नौर जिल्ह्याला उत्तराखंडमधील हर्षिल जिल्ह्याला जोडते.

ADVERTISEMENT

हे सर्व गिर्यारोहक पश्चिम बंगालमधील होते. तर तिघे उत्तर काशीचे होते. मृतांमध्ये पश्चिम बंगालमधील सहा गिर्यारोहकांचा समावेश असून, एक उत्तरकाशीचा आहे. तर पश्चिम बंगालचा एक आणि उत्तर काशीचा एक असे दोन गिर्यारोहक बेपत्ता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT