काशी विश्वनाथ मंदिराच्या गेटवरच नमाज अदा करण्यासाठी बसली महिला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या गेटवरच एक महिला नमाज अदा करण्यासाठी बसली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि या महिलेला उठवलं. तसंच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक ४ वर ही घटना घडली आहे. सध्या नमाज विरूद्ध हनुमान चालीसा असा वाद महाराष्ट्रात रंगला आहे. अशात देशभरातही काही अशा प्रकारच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या गेटवरच एक महिला नमाज अदा करण्यासाठी बसली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि या महिलेला उठवलं. तसंच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक ४ वर ही घटना घडली आहे.

सध्या नमाज विरूद्ध हनुमान चालीसा असा वाद महाराष्ट्रात रंगला आहे. अशात देशभरातही काही अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. ही महिला बराच वेळ काशी विश्वेवर मंदिराच्या बाहेर बसून नमाज अदा करत होती. पोलिसांनी वाट पाहिली आणि मग तिला उठवलं. या घटनेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसंच इथलं वातावरणही शांत आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक चारच्या बाहेर ही महिला नमाज अदा करत होती. या महिलेचं नाव आइसा असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वाराणसीतल्या जैतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही महिला राहते. या महिलेला नमाज अदा करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही महिला मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?