फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल सुभाष देसाई खोटं बोलताहेत का? व्हायरल बातमीमागचं सत्य काय?
वेदांता-फॉक्सकॉन कंपन्यांची भागादारी असलेला प्रोजेक्ट (vedanta-foxconn semiconductor plant) गुजरातमध्ये गेल्यानं नुकतेच सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर चौहीबाजूंनी टीका होऊ लागलीये. त्यातच एक बातमी व्हायरल होतं असून, सुभाष देसाई खोटं बोलत असल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून केली जातेय. २०२० मधील या बातमीवरूनही बरंच रणकंदन सुरू आहे. तैवान स्थित फॉक्सकॉन आणि वेदांता या कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून भारतात आता सेमीकंडक्टर […]
ADVERTISEMENT

वेदांता-फॉक्सकॉन कंपन्यांची भागादारी असलेला प्रोजेक्ट (vedanta-foxconn semiconductor plant) गुजरातमध्ये गेल्यानं नुकतेच सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर चौहीबाजूंनी टीका होऊ लागलीये. त्यातच एक बातमी व्हायरल होतं असून, सुभाष देसाई खोटं बोलत असल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून केली जातेय. २०२० मधील या बातमीवरूनही बरंच रणकंदन सुरू आहे.
तैवान स्थित फॉक्सकॉन आणि वेदांता या कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून भारतात आता सेमीकंडक्टर चिप निर्मिती केली जाणार आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्लांट महाराष्ट्रात उभारला जाणार होता, मात्र अचानक गुजरातमध्ये हा हा प्लांट होणार असल्याचं समोर आलं आणि राजकीय गदारोळ सुरू झाला.
फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्ट गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यात आता हा प्रोजेक्ट आधीच महाराष्ट्रातून परत गेला होता, अशी एक बातमी व्हायरल झालीये.
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राकडून गुजरातला, काय आहे क्रोनोलॉजी?