महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये ‘नो एंट्री’, कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
नंदूरबार: महाराष्ट्रात रोज 25 ते 30 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडत आहे. पण याची धास्ती आपल्या शेजारच्या राज्याने म्हणजेच गुजरातने खूप घेतली आहे. गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार, आता कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. गुजरात सरकारने बुधवारी काढलेल्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील केली जात आहे. उच्छल पोलिसांनी […]
ADVERTISEMENT

नंदूरबार: महाराष्ट्रात रोज 25 ते 30 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडत आहे. पण याची धास्ती आपल्या शेजारच्या राज्याने म्हणजेच गुजरातने खूप घेतली आहे. गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार, आता कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. गुजरात सरकारने बुधवारी काढलेल्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील केली जात आहे.
उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक तैनात केले आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलीस दलाला देण्यात आले आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असला तरच गुजरातमध्ये वाहनांना प्रवेश दिला जात आहे. अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातून त्यांना महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. यासाठी गुजरात राज्यातील आरोग्य पथक हे 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची तपासणी करीत आहे.
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरही कोरोनाच्या विळख्यात, Twitter वरुन दिली माहिती