Sanjay Raut : आम्ही लढणारे आहोत, लढत राहू : तुरुंगाबाहेर येताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. बुधवारी संध्याकाळी उच्च न्यायालयातही जामीनावर शिक्कामोर्तब होताच ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. यानंतर त्यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना हात उंचावून अन् मशाल चिन्ह असलेलं शिवसेनेचं भगवं मफलर उंचावून अभिवादन केलं. यावेळी 102 दिवसांपूर्वी तुरुंगातून जाताना त्यांचा जो आक्रमक अंदाज होता तोच पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी यावेळी ‘मुंबई तक’शी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझी अटक बेकायदेशीर होती, हे न्यायालयानं सांगितलं. न्यायालयानं सांगितलं म्हणजे खरचं असणार. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण शेवटी आम्ही लढणारे आहोत. लढत राहू, असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला.

आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरही जाणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलणं झालं. ते माझे सर्वोच्च नेते आहेत. माझे मित्र आहेत, भाऊ आहेत. माझा आवाज ऐकताचं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याही डोळ्यात अश्रू आले होते, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हे वाचलं का?

संजय राऊत यांच्या जामीनावर दिवसभर खलबत :

संजय राऊत यांना पीएमएलएच्या सत्र न्यायालयानं बुधवारी दुपारी जामीन मंजूर केला होता. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र ईडीकडून राऊत यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला होता. तसंच आपल्याला उच्च न्यायालायत जायचं आहे, असं सांगत ईडीने जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र पीएमएलए न्यायालयाने राऊतांचा जामीन कायम ठेवतं त्यांना दिलासा दिला.

त्यानंतर ईडीने याप्रकरणी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता याप्रकणावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अवघ्या काही मिनिटात यावर निर्णय देणं चुकीचं असल्याचं मत नोंदवत ईडीची याचिका फेटाळून लावली. तसंच ईडीच्या उच्च न्यायालयातील या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT