VIDEO: मुली-महिलांना पाहताच वासनांध तरूण करतो Kiss, सीरियल किसरची दहशत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Young Man Kiss by force girls and women: जमुई (बिहार): आपण आतापर्यंत अनेकदा सीरियल किलर्सबद्दल (Serial Killer) खूप ऐकलं असेल, पण सध्या एका सीरियल किसरमुळे (Serial Kisser) मुली आणि महिलांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. तसंच हा विषय लोकांमध्ये बराच चर्चेतही आहे. हा सीरियल किसर एक तरुण आहे जो अचानक अनोळखी महिला आणि मुलींना किस करतो आणि पळून जातो. मिळालेल्या माहितीनुसार, हे घाणेरडं कृत्य करणारा तरूण हा बिहारमधील (Bihar) आहे. (video lustful young man at sight of girls and women and makes kiss by force)

ADVERTISEMENT

बिहारच्या जमुई येथील एक सीसीटीव्ही फुटेजमधून हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका हॉस्पिटलच्या आवारात एक महिला मोबाइलवर कोणाशी तरी बोलत होती. याचवेळी एक तरुण अचानक महिलेच्या मागून आला आणि महिलेला काही कळायच्या आत त्याने जबरदस्तीने महिलेचे चुंबन घेतलं. अचानक एखादा तरूण येऊन आपल्या ओठांचं चुंबन घेईल ही गोष्ट तिच्या ध्यानीमनी देखील नव्हती. त्यामुळे या संपूर्ण घटनेने काही क्षण महिलाही अवाक् झाली. महिलेला काही समजेपर्यंत आरोपी तरूणाने तेथून पळही काढला होता.

हे वाचलं का?

दरम्यान, या व्यक्तीचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. महिलेचे चुंबन घेऊन तरुण तेथून फरार झाला. मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या व्हिडीओनंतर आता पुन्हा एकदा बिहारमधील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

इतकंच नाही तर घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटला तरी ना रुग्णालय व्यवस्थापन किंवा जमुई पोलीस या सीरियल किसरविरोधात कोणतीही कारवाई करू शकलेले नाही.

ADVERTISEMENT

रवीना टंडनने सांगितला मुंबई लोकलचा किस्सा, म्हणाली माझा विनयभंग…

ADVERTISEMENT

ही घटना शुक्रवारची असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर हॉस्पिटलच्या आवारात एक महिला आरोग्य सेविका कोणाशी तरी फोनवर बोलत होती. महिला आरोग्य सेविका जमुईच्या सदर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या चार भिंती ओलांडून एक तरूण आत आली आणि त्याने महिला आरोग्य सेविकेसोबत अश्लील वर्तन केलं. हे कृत्य पाहून महिला आरोग्य सेविका देखील हबकून गेली.

याप्रकरणी पीडितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी जमुई पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपी तरूणाचा शोध अद्यापही पोलिसांना लागू शकलेला नाही.

पुण्यात १९ वर्षीय तरूणीचा विनयभंग करणाऱ्या झोमॅटो बॉयला पोलिसांनी केली अटक

या प्रकरणाबाबत जमुईचे सदर डीएसपी डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले की, ‘ही बाब निदर्शनास आली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पूर्णपणे सक्रिय आहेत. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात येईल.’ असे ते म्हणाले.

पुणे हादरलं! वडील-काकांचा 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आजोबांनी केला विनयभंग

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT