स्वत:चा व्यवसाय सुरु करु इच्छिता? विनाजामीनदार मिळू शकते 10 लाखांपर्यंतचे सरकारी कर्ज; जाणून घ्या प्रोसेस
देशातील तरुणांना स्टार्ट-अप आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM मुद्रा योजना) चालवत आहे. या योजनेअंतर्गत, सरकार ग्रामीण भागात नॉन-कॉर्पोरेट लघु उद्योग सुरू करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. या योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या लोकांनी कर्ज परतफेडीच्या बाबतीत शिस्त दाखवली आहे. या योजनेंतर्गत सरकारने सात वर्षांत 20.9 लाख कोटी रुपयांचे कर्ज […]
ADVERTISEMENT
देशातील तरुणांना स्टार्ट-अप आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM मुद्रा योजना) चालवत आहे. या योजनेअंतर्गत, सरकार ग्रामीण भागात नॉन-कॉर्पोरेट लघु उद्योग सुरू करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. या योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या लोकांनी कर्ज परतफेडीच्या बाबतीत शिस्त दाखवली आहे. या योजनेंतर्गत सरकारने सात वर्षांत 20.9 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. एका माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बँकांपेक्षा कमी एनपीए
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सात वर्षांत या योजनेतील कर्ज केवळ 3.38 टक्के एनपीए आहे. त्याच वेळी, बँकिंग क्षेत्रातील एकूण एनपीए दर 5.97 टक्के आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज सहज उपलब्ध आहे आणि व्याजदरही स्वस्त आहे. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत राहिल्यास कर्जाचा व्याजदरही माफ होतो.
तीन श्रेणींमध्ये कर्ज योजना
मुद्रा योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज हे या योजनेचे तीन वर्ग आहेत. तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही शिशू कर्जाअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. किशोर कर्जाअंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. त्याचबरोबर तरुण कर्जाअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
हे वाचलं का?
व्याजदर किती आहे?
जर तुम्ही पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर जामीनदाराची गरज नाही. पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही. या दोन्ही कर्जांसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरात तफावत असू शकते. हे बँकांवर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर आहे.
कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले जाऊ शकते ?
पीएम मुद्रा योजनेअंतर्गत, लहान दुकानदार, फळे, अन्न प्रक्रिया युनिट्स यांसारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत कर्जासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. अनेक बँकांनी मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही https://www.mudra.org.in/ वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT