वर्धा: महालक्ष्मी स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, दोन कर्मचारी जखमी
वर्धा: वर्ध्यातील देवळी येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या महालक्ष्मी स्टील कारखान्यात एका भीषण स्फोट झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. या स्फोटात कंपनीत काम करणारे दोन कर्मचारी जखमी झाले असल्याचं समजतं आहे. आज (29 सप्टेंबर) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याचं येथील इतर कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, याबाबत वर्धा पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, […]
ADVERTISEMENT

वर्धा: वर्ध्यातील देवळी येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या महालक्ष्मी स्टील कारखान्यात एका भीषण स्फोट झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. या स्फोटात कंपनीत काम करणारे दोन कर्मचारी जखमी झाले असल्याचं समजतं आहे. आज (29 सप्टेंबर) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याचं येथील इतर कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, याबाबत वर्धा पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, आज (29 सप्टेंबर) सकाळची शिफ्ट सुरु होताच या स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या प्लांटमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. यावेळी प्लांटमध्ये एका भट्टीत लोखंडाचा तप्त असा रस वितळवला जात होता.
याचवेळी अचानक भट्टीत स्फोट झाला आणि लोखंडाचा तप्त रस हा बाहेर फेकला गेला. यावेळी प्लांटमध्ये दोन कर्मचारी तिथेच काम करत होते. जे यामध्ये गंभीररित्या जखमी झाले. जखमी झालेल्या या कर्मचाऱ्यांचं नाव नरेंद्र सिंग आणि अजयकुमार यादव असं असल्याचं समजतं आहे.
यामध्ये अजयकुमार याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आलं आहे. तर नरेंद्र सिंग याच्यावर सावंगी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आलं आहे.