Cm Eknath Shinde: “कोरोना झालेला असताना नाना पाटेकरांचे सगळे चित्रपट पाहिले”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना पाटेकर यांनी मला मागच्या आठवड्यात फोन केला होता. त्यावेळी गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात आलात तर घरच्या गणपतीच्या दर्शनालाही या असं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आज नाना पाटेकर यांच्या घरी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना पाटेकर यांनी मला मागच्या आठवड्यात फोन केला होता. त्यावेळी गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात आलात तर घरच्या गणपतीच्या दर्शनालाही या असं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आज नाना पाटेकर यांच्या घरी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना पाटेकर आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध अनेक वर्षांपासून आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार?; दीपक केसरकरांनी केला खुलासा
कोरोना झालेला असताना नाना पाटेकरांचे सगळे चित्रपट पाहिले
नाना पाटेकर हे माझे आवडते कलाकार आहेत. मला जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा मी त्यांचे सगळे चित्रपट पाहिले. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच सिंहगडाच्या पायथ्याशी नाना पाटेकरांनी जो वाडा बांधला आहे तो खरोखरच खूप छान आहे. नाना पाटेकरांचा जागेचा चॉईस उत्तम आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. निसर्गरम्य ठिकाणी नाना पाटेकर यांनी घर बांधलं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.