गुड न्यूज ! चक्रीवादळानंतर मुंबईच्या तलावांच्या पाणी पातळीत वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईच आणि महाराष्ट्राचं बरंच नुकसान झालं. मात्र याच चक्रीवादळाने मुंबईच्या झालेल्या पावसाने मुंबईतच्या 7 पैक 6 तलांवांमध्ये चार दिवसात 640 मिलि मीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. या पावसामुळे तलावच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई आणि परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबई महापालिकेच्या 7 पैकी 6 तलाव क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तलाव साठ्यात भर पडल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 210 मिली मीटर एवढा पाऊस हा विहार तलाव क्षेत्रात झाला असून, या खालोखाल तुळशी तलाव क्षेत्रात 178 मिली मीटर, मोडक सागर 102 मिली मीटर, ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ 62 मिली मीटर, तानसा 59 मिली मीटर, भातसा 29 मिली मीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या चार दिवसांत सर्वाधिक पाऊस हा विहार आणि तुळशी तलावात झाला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्राला दररोज तब्बल 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पाणीपुरवठा 7 तलावांमधील जलसाठ्यातून केला जातो. या 7 पैकी 5 तलाव हे महापालिकेच्या अखत्यारित आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील तुळशी व विहार या 2 तलावांसह मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा या मनपा क्षेत्राबाहेरील तलावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित अप्पर वैतरणा व भातसा हे 2 तलाव (धरण) राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकीकडे महाराष्ट्रात उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवत आहे. अनेक गावांमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी काही किलोमीटर चालत जावं लागत आहे. मुंबईतही उन्हाळ्यात अनेकदा पाणी कपातीची वेळ येते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अजून तरी मुंबईवर पाणी कपातीची वेळ आलेली नाही. मात्र या चक्रीवादळात मुंबईचं जे नुकसान झालं त्यानंतर आज मुंबईकरांसाठी चक्रीवादळानंतर आलेली ही खुषखबर असल्याचं बोललं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT