रियाज काझींकडून अँटिलीया प्रकरणातले काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – NIA ला संशय
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुक हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या NIA ने आज सचिन वाझेंना सोबत घेऊन मिठी नदीच्या पात्रात सर्च ऑपरेशन केलं. ज्यात NIA ला एक DVR, CPU आणि काही नंबरप्लेट मिळाल्या. दरम्यान सचिन वाझे यांच्या CIU मधील तत्कालीन सहकारी रियाज काझी यांनीही अँटिलीया प्रकरणातील काही पुरावे नष्ट केल्याचा NIA […]
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुक हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या NIA ने आज सचिन वाझेंना सोबत घेऊन मिठी नदीच्या पात्रात सर्च ऑपरेशन केलं. ज्यात NIA ला एक DVR, CPU आणि काही नंबरप्लेट मिळाल्या. दरम्यान सचिन वाझे यांच्या CIU मधील तत्कालीन सहकारी रियाज काझी यांनीही अँटिलीया प्रकरणातील काही पुरावे नष्ट केल्याचा NIA ला संशय आहे. NIA ने आज विक्रोळी परिसरातील एका नंबरप्लेटच्या दुकानात रियाज काझी आत जात असतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं आहे.
विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरातील एका दुकानात रियाज काझी आत जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे रियाज काझी या दुकानात गेल्यानंतर लगेच बाहेर पडत आहेत. विक्रोळीमधलं हे दुकान तुषार कदम नावाचा माणूस चालवतो, सध्या तुषार कदम मुंबईबाहेर असल्याचं कळतंय. कदम यांना ‘मुंबई तक’ ने रियाज काझी यांच्याविषयी विचारलं असता ते माझ्या दुकानात फक्त चौकशीसाठी आले होते, याव्यतिरीक्त मला याविषयी काहीही माहित नसल्याचं सांगितलं. NIA च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंटी रेडीयम शॉपमधल्या सीसीटीव्हीचं DVR आणि रजिस्टर CIU च्या पथकाने पुरावे नष्ट करण्यासाठी ताब्यात घेतलं होतं.
NIA चं सर्च ऑपरेशन, मिठी नदीत सापडला हरवलेला DVR










