डोंबाऱ्याच्या खेळात आम्हाला रस नाही, ही तर नळावरची भांडणं: शिवसेना-भाजपला ‘आप’ने फटकारलं
अझान, हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या विषयावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच गाजत आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष समोरासमोर आले असून प्रत्येक दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहेत. आम आदमी पक्षाने या घडामोडींवर टीका करताना ही तर सेना-भाजपची नळावरची भांडणं असून आम्हाला या डोंबाऱ्याच्या खेळात रस नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेना आणि भाजप हे […]
ADVERTISEMENT
अझान, हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या विषयावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच गाजत आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष समोरासमोर आले असून प्रत्येक दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहेत. आम आदमी पक्षाने या घडामोडींवर टीका करताना ही तर सेना-भाजपची नळावरची भांडणं असून आम्हाला या डोंबाऱ्याच्या खेळात रस नसल्याचं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष गेली 27 वर्ष एकत्र नांदले. आता त्यांच्यात सुरु असलेली भांडणं ही नळावरची भांडणं आहेत. या डोंबाऱ्याच्या खेळात जनतेला कोणताच रस नाही, असं मत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते कल्याण-डोंबिवलीत पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.
Navneet Rana, Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांनी जामीन न घेण्याची भूमिका का बदलली?
हे वाचलं का?
महाविकास आघाडी ही तीन चाकांचं सरकार आहे. त्यातलं एक चाक पंक्चर झालं तर दुसरं चाक फिट नाहीये आणि तिसऱ्या चाकामध्ये हवा कमी आहे. या तिन्ही पक्षांना सरकार नीट चालवता येत नाहीये. महागाईने होरपळलेल्या जनतेला, बेरोजगारीने होरपळलेल्या जनतेला आणि कोविडमुळे स्वतःच्या घराचं अर्थकारण कोलमडून पडलेल्या जनतेला या आशा डोंबाऱ्याच्या खेळात काहीच इंटरेस्ट नाहीये. सर्वसामन्यांना आता दिलासा हवा आहे.
“उद्ध्वस्त ठ….ने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा?” अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल
ADVERTISEMENT
महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारांना नोकरीची संधी मिळायला हवी, हेच आमचं राजकारण आहे आणि आम्हाला या डोंबाऱ्याच्या खेळात अजिबात इंटरेस्ट नाही असंही शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
…तर पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचा- भास्कर जाधवांनी राणांना फटकारलं
आमचं राजकारण फक्त आणि फक्त जगण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात असेल. रोटी कपडा आणि मकान, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण याच मुद्द्यांवर आम आदमी पक्ष भविष्यात राजकारण करेल, असंही शिंदे यांनी व्यक्त केलं.
झुंडशाहीचं असं राज्य कधीच पाहिलं नाही, आम्ही जशास तसं उत्तर देऊ-फडणवीस
आम आदमी पक्षासारखा पक्ष १ जुलै पासून ३०० युनिट फ्री देतो आहे. दिल्ली मध्ये सरप्लस वीज आहे. शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं की ३०० युनिट पर्यंतचं बिल आहे त्यावर ३० टक्के सवलत देणार आहोत. आपल्या राज्यात फक्त केंद्र सरकारवर दोष टाकण्याचा प्रकार सुरु आहे. राज्य सरकार स्वतःचं अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. इच्छाशक्ती असती तर कोळशाचं नियोजन करता आलं असतं आणि लोडशेडींगची गरजच आली नसती, असंही शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT