summons : समन्स म्हणजे काय?; त्यात काय असतं?
गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय आणि एनसीबी या यंत्रणांकडून केली जाणारी कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. या यंत्रणांकडून विविध प्रकरणात धाडी टाकल्या जात आहेत. त्याचबरोबर विविध व्यक्तींना समन्स बजावली जात आहेत. पण, अनेकांचा समन्स या शब्दाचा नेमका अर्थच माहिती नाही. त्यामुळे जाणून घेऊयात की, समन्स म्हणजे काय असते आणि त्यात काय लिहिलेलं असतं? समन्स म्हणजे […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय आणि एनसीबी या यंत्रणांकडून केली जाणारी कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. या यंत्रणांकडून विविध प्रकरणात धाडी टाकल्या जात आहेत. त्याचबरोबर विविध व्यक्तींना समन्स बजावली जात आहेत. पण, अनेकांचा समन्स या शब्दाचा नेमका अर्थच माहिती नाही. त्यामुळे जाणून घेऊयात की, समन्स म्हणजे काय असते आणि त्यात काय लिहिलेलं असतं?
समन्स म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी देण्यात आलेली सूचना म्हणजे समन्स! समन्स हे सक्षम अधिकारी किंवा न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी कायदेशीर बजावण्यात आलेली लिखित स्वरूपात सूचनाच असते. या सुचनेवर कायदेशीर कलमं आणि हजर राहण्याची कारणं, कार्यालयाचा शिक्का व सक्षम अधिकाऱ्याची सही असते.
न्यायालयात वा तपास यंत्रणांच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी विशिष्ट व्यक्तीला न्यायाधीश वा दंडाधिकारी किंवा संबंधित तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याने जारी केलेला लेखी हुकूम-दस्तऐवज. त्यास कायदेशीर भाषेत ‘सायटेशन’ असेही म्हटलं जातं. एखादया व्यक्तीविरूद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित रहावे, यासाठी न्यायालया वा तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याने हा लेखी आदेश जारी केलेला असतो.