मोफत लस घेतलीत ना, त्याचा पैसा कुठून येतो?’; पेट्रोल-डिझेल दरवाढीवर केंद्रीय मंत्र्याचं अजब विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारने सगळ्यांनी साठी कोरोना प्रतिबंधक लस मोफत अशी योजना आणली. मात्र आता एका केंद्रीय मंत्र्याने या सगळ्याचं कनेक्शन थेट पेट्रोल डिझेल दरवाढीशी जोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत याचं कारण मोफत कोरोना लस योजना आहे असं अजब वक्तव्य या केंद्रीय मंत्र्याने केलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी हे वक्तव्य आसाममध्ये केलं जे आता चर्चेत आलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत रामेश्वर तेली?

‘पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जास्त नाहीत, मात्र त्यावर लागणारा टॅक्स आहेच ना. तुम्ही फ्री व्हॅक्सिन घेतलं असेलच. त्यासाठी पैसे कुठून येणार? ज्यांनी फुकट कोरोना प्रतिबंधक लस घेतली त्यांचे पैसे असे इंधनावरच्या करातून वळते करण्यात आले.’

हे वाचलं का?

सोमवारी पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 35 पैसे प्रति लिटर महाग झालं. दिल्लीत एक लिटर पेट्रोल आता 104 रूपये 44 पैसे इतकं झालं आहे तर डिझेल 93.17 पैसे प्रति लिटर झालं आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105 रूपये 9 पैसे झाले आहेत. तर डिझेल 96 रूपये 28 पैसे प्रति लिटर झालं आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 110.41 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेल 101 रूपये 3 पैसे प्रति लिटर झालं आहे. चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर 101 रूपये 89 पैसे असं मिळतं आहे तर डिझेल 97 रूपये 69 पैसे प्रति लिटर मिळतं आहे.

परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किंमत मोजतो त्यापैकी पेट्रोलच्या किंमतीवर 55.5 टक्के आणि डिझेलच्या दरांवर 47.3 टक्के टॅक्स आहे. आता हा इतक्या मोठ्या प्रमाणावर लागणारा टॅक्स म्हणजेच मोफत कोरोना प्रतिबंधक लसींचे वळते केलेले पैसे आहेत असं वक्तव्य रामेश्वर तेली यांनी केलं आहे. याबाबत आता विरोधक काय भूमिका घेणार? यावरून रणकंदन माजणार का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT