काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीतून नागपूर-भंडाऱ्यात कधी आले? शरद पवारांचा नाना पटोलेंना टोला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला होते ते नागपूर भंडाऱ्यात कधी आले? असा टोला लगावत शरद पवारांनी नाना पटोलेंची खिल्ली उडवली आहे. नाना पटोले स्वबळाचा नारा देऊ शकतात, आम्ही तसं बोलू शकत नाही. कारण आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे असंही […]
ADVERTISEMENT
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला होते ते नागपूर भंडाऱ्यात कधी आले? असा टोला लगावत शरद पवारांनी नाना पटोलेंची खिल्ली उडवली आहे. नाना पटोले स्वबळाचा नारा देऊ शकतात, आम्ही तसं बोलू शकत नाही. कारण आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे असंही पवारांनी म्हटलं आहे. गडचिरोलीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी हा टोला लगावला आहे
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा अशीही सूचना त्यांनी केली. प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विलिनीकरण अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडावा असे आवाहन करत सरकारशी चर्चा करताना मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते मात्र जमावाशी नाही हे त्यांनी लक्षात आणून दिले.
हे वाचलं का?
केंद्र सरकारवरही टीका
धार्मिक तेढ आणि जातीयवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सत्ताधारी करत आहेत. त्रिपुरात काही घडलं त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. नांदेड, अमरावती, मालेगाव या ठिकाणी याचे परिणाम झाले. तिथं काही घडलं तर त्याची किंमत इथल्या लोकांना का द्यावी लागावी? ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्या पक्षाच्या लोकांची एकंदर भूमिका या सर्व परिस्थिती तेल ओतून आग वाढवण्याची होती. याचा अनुभव अमरावतीत घेता आला. त्यामुळे सांप्रदायिक विचार, जातीयवादी विचार, दोन समाजांमध्ये अंतर आणि द्वेष वाढवण्याचा विचार करणाऱ्यांना खड्याप्रमाणे बाजूला करा.
ADVERTISEMENT
शेती हा आपला महत्त्वाचा व्यवसाय आहे. या देशात स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 80 टक्के लोक शेती करत होते. देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आज देशाची लोकसंख्या 112 कोटी झाली. या 112 कोटींपैकी 60 टक्के लोक शेती करतात. याचा अर्थ शेतीवरील लोकांचा भार अडीच पटीने वाढला आणि जमिनी मात्र कमी होत आहेत. आपण धरणं बांधतो, रस्ते करतो, उद्योग आणतो, आणखी अनेक विकासाची कामं होती घेतो. यातील कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याला पहिली गरज जमिनीची आहे. त्यामुळे शेतीची जमीन कमी करावी लागते. साहजिकच शेतकऱ्यांवर एकप्रकारचा दबाव येत आहे. त्यांचं जमीन अधिगहण कमी होत आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT