संगीतसाधना आणि राष्ट्रप्रेम हे लतादीदींच्या मनात ओतप्रोत भरलेलं होतं-पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संगीत साधना आणि ईश्वराची साधना ही लता मंगेशकर यांच्यासाठी एकच होती. लता मंगेशकर यांचं संगीत क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी आठ दशकं संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारताचा गौरव झाला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

मला जो पुरस्कार देण्यात आला त्यात लताजींसोबत त्यांच्या वडिलांचं म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांचंही नाव जोडलं गेलं आहे. मंगेशकर परिवाराने जे योगदान दिलं आहे त्यामुळे देश त्यांचा ऋणी आहे. संगीत साधना करण्यासोबतच देशाबाबतचा प्रचंड अभिमान त्यांच्या ठायी होता. त्याचा स्रोत त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकरच होते. दीनानाथ मंगेशकर यांनी वीर सावरकरांची कविता एका ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर सादर केली होती. असं करण्याची हिंमत फक्त दीनानाथ मंगेशकर यांनीच दाखवली.

शिवकल्याण राजा या कार्यक्रमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट अमर झाली. ऐ मेरे वतन के लोगे या गाण्याचे बोल आजही आपल्या ओठी येतात. त्याला कारण लताजींचं राष्ट्रप्रेम त्यामागचं कारण होतं. लतादीदींनी ३० हून जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. त्यांनी संगीत अजरामर केलं. ते गाणं त्यांनी जगून दाखवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

तुलसी, मीरा, संत ज्ञानेश्वर यांची गीतंही त्यांनी समाजात रुजवली. लताजींच्या आवाजामुळे अनेक गाणी पुनर्जिवित झाली. संस्कृती ते भक्ती, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देश एक सूत्रात बांधण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या गाण्यातून केला आहे.

पुण्यात लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे दीनानाथ मंगेशकर यांचं रूग्णालय सुरू केलं. ते गरीबांसाठी काम करणारं रूग्णालय आहे. कोरोना काळात जी काही ठराविक रूग्णालयं होती ज्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं त्यापैकी एक रूग्णालय दीनानाथ मंगेशकर रूग्णालय होतं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लता मंगेशकर विशेष पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांचा गौरव करण्यात आला.

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांना सर्वोत्कृष्ट जनसेवेसाठीचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे, चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कारकीर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ, तर नूतन मुंबई टिफिन चॅरिटेबल ट्रस्ट यांना सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT