शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना गुणरत्न सदावर्तेंमधील नथुराम जागा झाला होता-आव्हाड

मुंबई तक

शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना गुणरत्न सदावर्तेंमधला नथुराम गोडसे जागा झाला होता असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे. नथुराम गोडसेला नथुरामजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड? “गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्यावेळी नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शरद पवारांच्या घरावर हल्ला करताना गुणरत्न सदावर्तेंमधला नथुराम गोडसे जागा झाला होता असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे. नथुराम गोडसेला नथुरामजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?

“गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्यावेळी नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्ते मधील नथुराम गोडसे जागा झाला होता”, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. गुणरत्न सदावर्तेच वक्तव्य ऐकलं की घृणा वाटते आणि किळस येते. देशातील पहिला आतंकवादी असणारा नथुराम गोडसे याला सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे खासदार अमोल कोल्हेंकडून आत्मक्लेश

हे वाचलं का?

    follow whatsapp