सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचे भवितव्य ठरत असताना संजय राऊतांच मुंबईत दर्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत मागच्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. आज दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या भवितव्याची सुनावणी सुरु असताना संजय राऊतांचं मुंबईमध्ये दर्शन झालं आहे. आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यासाठी राऊत सुनावणीस उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं संजय राऊतांना ताब्यात घेतलं आहे, मागच्या जवळपास २ महिन्यांपासून संजय राऊत कोठडीमध्ये आहेत.

ADVERTISEMENT

संजय राऊतांची १४ दिवसांनी कोठडी वाढवली

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढवली आहे. संजय राऊत यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत मागच्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै ला उशिरा अटक

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैला उशिरा अटक करण्यात आली होती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली. तेव्हापासून संजय राऊत हे ईडी कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यावरून ईडीने या प्रकरणाचा मनी लाँडरिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT