विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघीण’; कोण आहेत शुभांगी पाटील?
Who is shubhangi patil | Nashik graduate constituency नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. अखेरच्या दिवशी नाशिकमधून २२ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी माघार घेतली. यात डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल खोडे, दादासाहेब पवार, धनंजय जाधव, राजेंद्र निकम आणि धनराज विसपुते यांनी माघार घेतली. त्यानंतर आता नाशिकमधून १६ उमेदवार निवडणुकीच्या […]
ADVERTISEMENT
Who is shubhangi patil | Nashik graduate constituency
ADVERTISEMENT
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. अखेरच्या दिवशी नाशिकमधून २२ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी माघार घेतली. यात डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल खोडे, दादासाहेब पवार, धनंजय जाधव, राजेंद्र निकम आणि धनराज विसपुते यांनी माघार घेतली. त्यानंतर आता नाशिकमधून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
१६ उमेदवार रिंगणात असले तरीही प्रामुख्याने लढत होणार आहे ती दोन अपक्ष उमेदवारांमध्ये. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात आता थेट लढत होणार आहे. यात सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे, तर शुभांगी पाटील यांना शिवसेना (UBT) आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, शिवसेना (UBT) आणि महाविकास आघाडीने काहीशा नवख्या असलेल्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दाखविल्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यापुढे कडवं आव्हान उभं राहिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शुभांगी पाटील नेमक्या आहेत तरी कोण याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाल्या आहेत.
कोण आहेत शुभांगी पाटील?
-
शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी शिक्षण पूर्ण केलं आहे.
ADVERTISEMENT
पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
ADVERTISEMENT
त्याशिवाय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या त्या राज्याध्यक्ष आहेत.
पाटील महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.
तसेच पाटील महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत.
याशिवाय शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
शुभांगी पाटील मूळच्या राष्ट्रवादीच्या :
महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. राष्ट्रवादीत असताना त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. काही काळ राष्ट्रवादीसोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन केली आणि त्यामाध्यमातून काम सुरु केलं.
पुढे २१ सप्टेंबर २०२२ रोजी शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. नाशिक पदवीधरसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी आग्रही होत्या. मात्र भाजपने एबी फॉर्मसाठी त्यांचा विचार न केल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर देखील त्या भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या.
मात्र भाजप अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचं चित्र आहे, हे ओळखून त्यांनी तात्काळ मातोश्रीसोबत संपर्क साधला. त्यानंतर मातोश्रीवरुनही त्यांना पाठिंबा देण्यााबाबत अनुकूलता दाखविण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर सत्यजीत तांबे यांना कडवी टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT