Pradeep Gharat : राणा, राणेंना जेलमध्ये टाकणारे प्रदीप घरत कोण आहेत?
राणा असो की राणे… ठाकरे सरकारने धाव घेतली ती एकाच वकिलाकडे. ते वकील म्हणजे, प्रदीप घरत. घरत यांच्याच युक्तीवादाने राणेंना आणि दोन्ही राणांना कोठडी जावं लागलं. वेगवेगळ्या केसेसमध्ये प्रदीप घरत हेच सरकारी वकील म्हणून पोलिसांची बाजू मांडत आहेत. त्यामुळेच आपण प्रदीप घरत कोण आहेत, ते ठाकरेंनाच नाही, तर फडणवीसांनाही का आवडतात आणि आरोपीला जन्मठेप मिळवून […]
ADVERTISEMENT
राणा असो की राणे… ठाकरे सरकारने धाव घेतली ती एकाच वकिलाकडे. ते वकील म्हणजे, प्रदीप घरत. घरत यांच्याच युक्तीवादाने राणेंना आणि दोन्ही राणांना कोठडी जावं लागलं. वेगवेगळ्या केसेसमध्ये प्रदीप घरत हेच सरकारी वकील म्हणून पोलिसांची बाजू मांडत आहेत. त्यामुळेच आपण प्रदीप घरत कोण आहेत, ते ठाकरेंनाच नाही, तर फडणवीसांनाही का आवडतात आणि आरोपीला जन्मठेप मिळवून देण्यातले मास्टर म्हणून त्यांची ख्याती का आहे? हेच जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
आतापर्यंत आपण राज्यात कोणतंही मोठं प्रकरण घडलं की उज्जवल निकम हे सरकारी वकील म्हणून पोलिसांची म्हणजेच सरकारची बाजू मांडायचे. पण आता काळ बदलला आहे. सरकार कुणाचंही असो सरकारी वकील प्रदीप घरत असतात.
महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या प्रकरणात घरत यांनीच सरकारी वकील म्हणून बाजू मांडली. गेल्या काही काळात तर घरत हे ठाकरे सरकारचे फेवरेट वकील म्हणून समोर आलेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल घरत सरकारला एवढं का आवडतात? तर त्याचं उत्तर आपल्याला घरत यांनी आतापर्यंत लढवलेल्या वेगवेगळ्या केसेसमध्ये सापडतं. त्यामुळेच आपण प्रदीप घरत कोण आहेत, आणि त्यांनी कोणकोणत्या केसेस लढवल्या ते बघावं लागतं.
हे वाचलं का?
इंडिया टुडे, आज तकसाठी कोर्ट बीट बघणाऱ्या पत्रकार विद्या यांनी घरत कोण आहेत, त्यांनी कोणकोणत्या केसेस लढवल्या याची माहिती दिली. विद्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरत हे मुळचे अलिबागचे असलेले सध्या मुंबईत राहतात. एक शांत, मृदुभाषी वकील म्हणून ते ओळखले जातात.
जवळपास दोन दशकांहून अधिक काळापासून ते वकिली पेशात आहेत. आपल्या कारकीर्दितला बराचसा काळ त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असतानाच ते सध्या ते छोटा राजन प्रकरणात सीबीआयचेही वकील आहेत.
ADVERTISEMENT
आता आपण घरत यांनी कोणकोणत्या केसेस लढवल्या ते बघूया:
ADVERTISEMENT
कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टँम्प घोटाळ्यातही घरत यांनी सीबीआयचे वकील म्हणून युक्तीवाद केला. आणि याच प्रकरणात अब्दूल करीम तेलगीला जन्मठेपेची शिक्षा झाली.
महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात घरत यांनीच पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पुरावे गोळा केले होते. घरत यांनी आतापर्यंत जवळपास 30 हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली आहेत.
यापैकी तब्बल 25 प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यामुळेच आरोपीला जन्मठेप मिळवून देण्यात मास्टरी असलेले वकील म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांनी सरकारी वकील म्हणून काम बघितलेल्या पत्रकार जे डे हत्याकांडातही नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
2015 मध्ये मुंबई सेशन कोर्टात सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली. घरत यांनीच सरकारी वकील म्हणून काम केलं होतं. तेव्हा सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्ज्वल निकम यांनी सलमानविरोधातली केस लढवायला नकार दिला होता आणि त्यानंतरच ही केस घरत यांच्याकडे देण्यात आल्याचं बोललं जातं.
2016 मध्ये अलिबागमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड गाजलं. या प्रकरणात बिद्रे कुटुंबियांनी तर निकम यांच्याऐवजी घरत यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
2015 मध्येच मुंबईच्या मालवणीत विषारी दारू पिऊन 105 जणांचा जीव गेला होता. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारनेही घरत यांनाच सरकारी वकील म्हणून नेमलं होतं.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेक हायप्रोफाईल केसेस घरत बघतात. सध्या महाराष्ट्रात भाजप नेत्यांविरोधात ज्या केसेस दाखल होत आहेत, त्या सर्व प्रकरणात घरतच विशेष सरकारी वकील म्हणून काम बघतात.
नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?
वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली आणि पोलीस कोठडी झाली त्या सिल्वर ओक प्रकरणातही घरतच सरकारी वकील आहेत. सिंधुदुर्गमध्ये नितेश राणेंना अटक आणि कोठडी झाली, ते प्रकरणही घरत यांनीच बघितलं. प्रवीण दरेकरांविरोधातलं मजूर प्रकरण असो की सोमय्या प्रकरण घरत यांनी सरकारची बाजू मांडली.
या केसेस आणि त्यांचा निकाल बघितल्यावर आपल्याला घरत सरकारला का आवडतात याचं उत्तर मिळतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT