एकनाथ खडसे यांना ED ने चौकशीसाठी का बोलावलं? काय आहे कारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ही चौकशी राजकीय हेतूने केली जाते आहे. मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आलो त्यामुळे माझ्याविरोधात कारवाया सुरू झाल्या. मात्र चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र ईडी एकनाथ खडसे यांना का बोलावतं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी बुधवारी 7 जुलै एकनाथ खडसे यांना ईडीकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यानंतर एकनाथ खडसे हे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र रात्री उशिरा खडसे यांनी तब्बेत बिघडल्यामुळे पत्रकार परिषद रद्द घेणं रद्द केलं.

ADVERTISEMENT

काय आहे भोसरीचं भूखंड प्रकरण?

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

हे वाचलं का?

या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली. दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

ज्या प्रकरणात क्लिन चीट मिळाली आहे त्याच प्रकरणात ईडीने चौकशी का सुरू केली आहे?

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. कारण त्यांनी पक्ष बदलला हे त्यामागचं कारण आहे. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडतानाही या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला होता. आता खडसे राष्ट्रवादीत आहेत तिथेही त्यांना त्रास देत रहायचा असा एक उद्देश असू शकतो.

ADVERTISEMENT

मागच्या अधिवेशनाच्या वेळी अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं की संजय राठोड आणि अनिल परब या दोन मंत्र्यांच्या राजीनामे झाले. त्यानंतर अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लावण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना त्रास द्यायचा आणि राष्ट्रवादीची प्रतिमा उत्तर महाराष्ट्रात बदनाम करून तिथे भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करायचं अशीही एक शक्यता असू शकते.

एकनाथ खडसे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी ज्या प्रकारे फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यावरून हेच दिसलं होतं की भाजप पेक्षाही त्यांचा राग फडणवीस यांच्यावर जास्त आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी शत्रुत्व घेऊन त्यांनी पक्ष सोडला त्यामुळे पक्षातले अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज झाले आहेत अशीही चर्चा आहे. पक्ष सोडल्या सोडल्या लगेच कारवाई केली नाही पण ती आता केली आहे त्यामुळे त्या नाराजीचा कुठेतरी फटका हा खडसेंना बसला आहे असंही बोललं जातंय. त्यामुळे तूर्तास तरी राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई केली जाते आहे हे खडसेंचं म्हणणं पटण्यासारखं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT