एकनाथ शिंदेंच्या मनोहर जोशी, लीलाधर डाके यांच्या भेटीमागे ‘मिशन १८८’?
शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची सुत्रं स्वतःच्या हाती घेण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहेत का? असा प्रश्न त्यांच्या एकूण भेटीगाठी आणि हालचालींवरून उपस्थित होतं आहे. शिंदे यांच्या भेटीगाठींचा वेगळा अर्थ शिंदे गटाकडून सांगितला जात असला, तरी या भेटीमागे मिशन १८८ असल्याचं दिसत आहे. शिवसेनेत मोक्याची पदं आणि मातोश्रीजवळ असलेल्या नेत्यांच्या […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची सुत्रं स्वतःच्या हाती घेण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहेत का? असा प्रश्न त्यांच्या एकूण भेटीगाठी आणि हालचालींवरून उपस्थित होतं आहे. शिंदे यांच्या भेटीगाठींचा वेगळा अर्थ शिंदे गटाकडून सांगितला जात असला, तरी या भेटीमागे मिशन १८८ असल्याचं दिसत आहे.
शिवसेनेत मोक्याची पदं आणि मातोश्रीजवळ असलेल्या नेत्यांच्या भेटी एकनाथ शिंदे घेत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच दिवशी वाढदिवस (२७ जुलै) होता. एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखांना भेटले नाही, पण त्यांनी रामदास कदम यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदेंनी घेतली लीलाधर डाके, मनोहर जोशींची भेट
शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांना आपल्या बाजूंने वळवण्यात यशस्वी ठरल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन शिवसेनेची नवी कार्यकारिणी निवडली. यात शिंदेंनी स्वतःची शिवसेना मुख्य नेता म्हणून वर्णी लावून घेतली. त्यामुळे शिंदेंकडून शिवसेना ताब्यात घेण्याचेच प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.
यातच शिंदेंनी शिवसेना कार्यकारिणीतील लीलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेतली. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले असून, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.