Jacqueline Fernandez ला अटक का केली नाही? कोर्टाचा ईडीला प्रश्न
२०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? असा प्रश्न कोर्टाने ईडीला विचारला आहे. आज जॅकलिन फर्नांडिस तिच्या नियमित सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात आली होती. कोर्टाने आज जॅकलिनच्या जामिनावरचा युक्तिवाद ऐकून घेतला. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने ईडीवर काही आरोप करण्यात आले आहेत. काय म्हटलं आहे जॅकलिन फर्नांडिसने? […]
ADVERTISEMENT

२०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? असा प्रश्न कोर्टाने ईडीला विचारला आहे. आज जॅकलिन फर्नांडिस तिच्या नियमित सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात आली होती. कोर्टाने आज जॅकलिनच्या जामिनावरचा युक्तिवाद ऐकून घेतला. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने ईडीवर काही आरोप करण्यात आले आहेत.
काय म्हटलं आहे जॅकलिन फर्नांडिसने?
माझ्यावरचे सगळे आरोप हे निराधार आणि बिनबुडाचे आहेत असं जॅकलिन फर्नांडिसने म्हटलं आहे. मी माझ्या कामासाठी विदेशात जात असते. मात्र मला विदेशात जाण्यापासूनही रोखण्यात आलं. मी गेल्या वर्षी च्या जानेवारी महिन्यात आईला भेटायला जाणार होते पण मला आईलाही भेटायला जाऊ दिलं नाही.
जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?
कोर्टाने काय म्हटलं आहे?
एलओसी जारी करूनही तुम्ही अद्याप जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? इतर आरोपी तुरुंगात आहेत तुम्ही या मनी लाँड्रींग प्रकरणात निवडक लोकांनाच अटक करत आहात का? असा प्रश्न कोर्टाने आज विचारला आहे.