पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर का गोळ्या झाडल्या?; हल्लेखोरानेच सांगितलं खरं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी एका रॅलीदरम्यान गोळीबार झाला होता. ज्यामध्ये इम्रान खान जखमी झाले होते. आता ज्याने इमरान खान यांच्यावर गोळीबार केली होती त्याचा कबुल करणारा व्हिडीओ समोर आला आहे. फैजल भट्ट असं या हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने गोळी का चालवली, याबाबत खुलासा केला आहे.पीटीआयच्या आझादी मार्चदरम्यान मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती आणि त्यामुळे अजान सुरु असताना अढथळा होत असल्याने त्याने इम्रान खानवर हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

गुरूवारी म्हणजेच ३ नोव्हेंबरला पाकिस्तानातील गुजरांवाला येथील अल्लाहवाला चौकात पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला होता. इम्रानच्या स्वातंत्र्य पदयात्रेचा ताफा इस्लामाबादच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला. त्यानंतर फैसल भट्टने इम्रान खानवर गोळीबार केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला पकडले. मात्र, तोपर्यंत या व्यक्तीने गोळीबार केला होता. पाकिस्तानी मीडियानुसार, या हल्ल्यात इम्रानच्या पायाला गोळी लागली होती. यानंतर त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला आपल्या संरक्षणात घेतले.

अजानदरम्यान म्युझिक वाजल्याने मला चुकीचे वाटले, म्हणून मी गोळी चालवली

इम्रान खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने आपल्या कबुलीजबाबात जे म्हटले आहे ते खूपच विचित्र आहे. त्याने म्हटले आहे की, तिथे अजान होती, इथे हे लोक डीएसी (ऑडिओ सिस्टम) लावून आवाज करत होते, ही गोष्ट माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने चांगली मानली नाही. मग ठरवलं की आता सोडायचं नाही. याशिवाय फैजल भट्ट असेही म्हणाला की, इम्रान खान लोकांची दिशाभूल करत आहेत आणि मला ते चुकीचं वाटलं त्यामुळं मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

मात्र, फैजलचे हे वक्तव्य पाकिस्तानच्या न्यायालयात कितपत टिकते हे सांगणे फार कठीण आहे. पण जर या व्यक्तीने इम्रानवर हल्ला केला असेल कारण त्याच्या रॅलीचा आवाज अजानला त्रास देत होता, तर यावरून पाकिस्तानमध्ये धार्मिक अतिरेकीने पातळी गाठली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, हे विधान सुनियोजित केले गेले असावे आणि खऱ्या हल्लेखोराला वाचवण्यासाठी आणि या प्रकरणाचा तपास दुसरीकडे वळवण्यासाठी हे विधान हल्लेखोराने केले असावे. जेणेकरून या हल्ल्याचे खरे गुन्हेगार बाहेर येऊ नयेत, असं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT