वेळ आली तर Shivsena Bhavan ही तोडू, BJP आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई महापालिकेची निवडणूक जशीजशी जवळ येते आहे तसंतसं भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबईच्या माहिम भागात भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू असं वक्तव्य भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला भाजप आमदार नितेश राणेदेखील हजर होते. माहिमच्या राडा बडे चौकात आज भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा […]
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेची निवडणूक जशीजशी जवळ येते आहे तसंतसं भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबईच्या माहिम भागात भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू असं वक्तव्य भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला भाजप आमदार नितेश राणेदेखील हजर होते.
ADVERTISEMENT
माहिमच्या राडा बडे चौकात आज भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी करावी याबद्दल दोन्ही आमदारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी शिवसेनेला टोला लगावताना प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
जाणून घ्या काय म्हणाले प्रसाद लाड?
हे वाचलं का?
“भाजपची ताकद काय आहे हे २०१४ विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे. यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु”, असं लाड म्हणाले.
प्रसाद लाड इथेच थांबले नाही तर यापुढे जाऊन त्यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं. “यापुढे दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तर तिकडे मला आणि नितेश राणेंना बोलवा. कारण आम्ही आल्यावर तिथे कोणच थांबणार नाही. शिवसेनेच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. कुठली नाडी आवळली की कोण टॅहँ करणार हे आम्हाला माहिती आहे”, असं म्हणत लाड यांनी शिवसेनेला चिमटा काढला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT