फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या

मुंबई तक

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या महिला कॉन्स्टेबलचाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास केला असता मृतदेह रुची सिंह या महिला कॉन्स्टेबलचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात एका तहसीलदाराला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर पोहोचली नव्हती. यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्याशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या महिला कॉन्स्टेबलचाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास केला असता मृतदेह रुची सिंह या महिला कॉन्स्टेबलचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात एका तहसीलदाराला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर पोहोचली नव्हती. यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुची सिंहचा फोन सतत बंद येत होता. त्यांनी तिच्या सहकाऱ्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दुसरीकडे काली माता परिसरातील नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीनंतर हा मृतदेह रुची सिंह हिचाच असल्याचं समोर आलं होतं. जेव्हा पोलिसांनी या हत्येचा तपास सुरु केला तेव्हा त्यांना अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली.

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp