काल टीका, आज कौतुक; पंतप्रधान मोदींकडून पवारांवर स्तुतीसुमनं!

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. खरंतर काल (सोमवार) राज्यसभेतच कृषी कायद्यांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. पण आज लागलीच त्यांनी पवारांचं कौतुक देखील केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या दोन्ही गोष्टीबाबत चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. खरंतर काल (सोमवार) राज्यसभेतच कृषी कायद्यांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. पण आज लागलीच त्यांनी पवारांचं कौतुक देखील केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या दोन्ही गोष्टीबाबत चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतला कार्यकाळ आज संपत असल्याने त्यांच्या सभागृहातील अखेरच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी भाषण केलं. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनीही भाषण करताना आझाद यांचं बरंच कौतुक केलं. याचवेळी त्यांनी पवारांचं देखील कौतुक केलं.

मोदींकडून आज पवारांचं कौतुक, पाहा काय म्हणाले!

गुलाम नबी आझाद यांच्याबाबत बोलत असताना पंतप्रधान मोदी असं म्हणाले की, ‘मला चिंता या गोष्टीची आहे की, गुलाब नबी यांच्यानंतर हे पद जे सांभाळणार आहेत त्यांना गुलाब नबी यांची जागा घेणं बरंच जड जाईल. कारण गुलाब नबी हे आपल्या पक्षाचा तर विचार करायचेच पण ते आपल्या देशाची आणि सभागृहाची देखील तेवढीच चिंता करायचे. ही छोटी गोष्ट नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. मी शरद पवार यांना देखील याच कॅटेगरीत ठेवतो. ते सभागृह आणि देशाच्या चिंतेला प्राधान्य देणारे नेते आहेत.’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करतानाच शरद पवारांचं देखील कौतुक केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp